Press "Enter" to skip to content

कुणाल महेंद्र घरत यांचा राजेशाही थाटात विवाहसोहळा संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उलवे ।

रायगड मधील कॉंग्रेस पक्षाचे वजनदार नेते, कामगार नेते, राष्ट्रीय इंटकचे सचिव तथा आय टी एफ इंग्लडचे व्हा.चेअरमन सन्माननीय महेंद्रशेठ घरत यांचे चिरंजीव कुणाल घरत यांचा विवाहसोहळा न भुतो न भविष्यतो असा साजरा झाला.

सतत समाजाशी बांधीलकी जोपासुन समाजासाठी, कामगारांसाठी आणि दिनदुबळ्या गरिबांसाठी काम करणारे नेते म्हणजे महेंद्रशेठ घरत हे ओळखले जातात. त्यांच्या चिरंजीवांच्या विवाह प्रसंगी सतत तीन दिवस राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींची उपस्थिती या विवाह सोहळ्याचे वैशिष्टय ठरली.

या मोठ्या व्यक्तिमत्वांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री तथा खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री-आमदार शाशिकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार-लोकनेते रामशेठ ठाकुर,आमदार प्रशांत ठाकुर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे ,आमदार रमेश पाटील, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, बबनदादा पाटील, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष माणिकराव जगताप, रायगड जिल्हा परिषद सद्स्य बाजीराव परदेशी, रवी पाटील, रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा सौ. श्रद्धाताई ठाकूर, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष आर. सी घरत, सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, नवीमुंबई महापौर जयवंत सुतार,पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमोल, उरण नगराध्यक्ष सायली म्हात्रे, अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उद्योगपती पी.पी खारपाटील, राजाशेठ खारपाटील,प्रांताधिकारी,तहसीलदार, सिडकोचे अधिकारी, आजी माजी जि. प. सदस्य, पंचायत सामिती सदस्य, सरपंच, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रीय इंटकचे अनेक पदधिकारी, त्यामध्ये आय टी एफ (ITF) लंडन चे NSUI जनरल सेक्रेटरी. अब्दुल गणी सारंग, असिस्टंट जनरल सेक्रेटरी एसिया पॅसिफीक, संगम त्रिपाठी, डेप्युटी डायरेक्टर मनिबेनकारा. अजयकुमार रॉय, ILO कॅन्सलटन्ट. राजेंद्र गिरी, मुंबई इंटक अध्यक्ष. अनिल गणाचार्य, महाराष्ट्र महिला इंटक अध्यक्षा सौ. भाग्यश्री भुरके, ITF वुमेंन्स कोः ऑरडिनेटर मिसेस कल्पना देसाई, अनेक पक्षाचे, संस्थेचे पदधिकारी, पत्रकार, शासकिय अधिकारी, शेतकरी, कोळी बांधव मोठया संख्येने उपस्थित राहुन नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.

या निमित्ताने महेंद्रशेठ घरत यांची विविध क्षेत्रातील ओळख, परिचय व त्याचे असलेले ऋणानुबंध याचा परिचय उपस्थितांस आला. आपल्या मेहनतीने, प्रामाणिकपणाने, आणि परमेंश्र्वराच्या अशिर्वादाने अमाप संपत्ती कमवली आणि या सर्वांच्या सोबत अनेक माणसे जोडून त्याच्याशी असलेले ऋणानुबंध ही या शुभविवाह प्रसंगी उपस्थितांना पहावयास मिळाले.

आगरी समाजाचा नेता खऱ्या अर्थाने सर्वाना अभिमान वाटावा असे कार्य कोरोना काळामध्ये केले आणि त्याची पोचपावती म्हणून काही दिवसांपूर्वीच त्यांना मानाच्या “सकाळ सन्मान” पुरस्कारने ही गौरवीण्यात आले.
आपल्या मुलीचा ही विवाह सोहळा उमेद भवन जोधपुर राजस्थान येथे की ज्या ठिकाणी बहुतांश नामवंत सेलेब्रिटी लोकांची किंवा त्या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तींचे विवाह सोहळे संपन्न होत असतात…. आणि अश्या ठिकाणी विवाह सोहळा पार पाडणारी आपल्या आगरी समाज्याची पहिली व्यक्ती महेंद्रशेठ ठरली आहे.अशा महेंद्रशेठ घरत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे व हार्दिक अभिनंदनही केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.