Press "Enter" to skip to content

हेदवली येथे कालव्याचे पाणी नदीला सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नदी मधील गाळ न काढल्यास उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील सुकेली मार्गी ऐनघर,हेदवलीकडे जाणाऱ्या कालव्याचे पाणी बाराही महिने सुरु असते व सदरचे पाणी हेदवली गावाच्या अगोदर असणाऱ्या नदीला वळवण्यात आले असुन या नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होत असते तसेच या काळव्याच्या पाण्याबरोबर येणारा गाळ ही नदीला येत आहे.या गाळामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने तो पाणी खाली नदीला न जाता तो उलट फिरून शेताकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

या कालव्यामधून पाण्याबरोबर गाळ नदीत येत असून यामुळे ही नदी पूर्णपणे गाळामुळे भरलेली असून हे पाणी खाली न जाता तो हेदवली येथील शेतकरी मंगेश लाड,नारायण लाड,सुनिल लाड,सहदेव साळवी, विठोबा पास्टे,तुकाराम राऊत, राम शिर्के, विश्वनाथ लाड, सुधीर शिंदे, व इतर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

याविषयी ऐनघर बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी व संघटनेचे पदाधिकारी यांच्या तर्फे कोलाड पाटबंधारे विभाग कार्यालय यांच्याकडे दि.२३ फेब्रुवारी २०२१ रोजी लेखी अर्ज केला असुन यामध्ये पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांनी प्रत्येक्षात जागेवर जाऊन पाहणी करुन नदीत साठलेला गाळ आठ दिवसाच्या आत काढण्यात यावा नाहीतर पाटबंधारे खात्याच्या आवारात संविधानाच्या मार्गाने उपोषण करण्यात अशा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.