Press "Enter" to skip to content

गोरेगावतर्फ वडगाव कोंड येथील वणव्यामुळे शेत बेचिराख

पालकमंत्री ना अदिती तटकरे यांनी दिले तातडीने लक्ष

सिटी बेल लाइव्ह । गोरेगाव ।

गोरेगाव वडगाव कोंड येथील शेतकरी व रोटरी क्लब ऑफ इंडियाचे गोरेगाव अध्यक्ष रघुनाथ गोविंद गावडे यांच्या शेतात वणवा आल्यामुळे काल रात्री बोअरवेलचा पॉवर सप्लाय, आंब्याची कलमे, अन्य पीक, ठिबक सिंचन आदी जळून खाक झाले आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांना वणव्यातील नुकसानीबाबत शेतकरी रघुनाथ गोविंद गावडे यांनी कळविले असता पालकर यांनी रायगडच्या पालकमंत्री ना अदिती तटकरे यांना सदरची घटना सांगून तातडीने लक्ष देण्यास विनंती केली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाही ना. अदिती तटकरे यांनी तहसिलदार माणगाव प्रियंका कांबळे यांना पंचनामा करण्यासाठी गोरेगाव सजेचे तलाठी वैभव आंबरे यांना वडगावकोंड येथील वणवाग्रस्त शेतावर पाठविण्याचे आदेश देत तत्परतेने पंचनामा करण्यास प्रशासनाला कृती करण्यास भाग पाडले.

कोकणातील आंबा बागायतदार व शेतकऱ्यांना वणव्यामुळे दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर हानी सोसावी लागत असताना वणव्यामुळे होणारे नुकसान नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाईस पात्र ठरविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात निर्णय घेण्याचे आवाहन रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.