Press "Enter" to skip to content

पनवेल मनसे चा वाद पोहचला “राज दरबारी”

मनसेच्या पनवेल – नवीन पनवेल शहर अध्यक्ष आणि तालुका सचिव पदाला राज ठाकरेंची स्थगिती 

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने नियुक्त केलेल्या पनवेल नवीन पनवेल शहर अध्यक्ष पदाला आज स्थगिती दिली त्याच बरोबर तालुका सचिव पदाला देखील स्थगिती दिली आहे. तसे पत्र राजगड मुख्य कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वी पनवेल नवीन पनवेल शहर अध्यक्ष पदी यतीन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच तालुका सचिव म्हणून अमोल पाटील याना अचानक पदभार देण्यात आला. याबाबत तत्कालीन सचिव तसेच मनसेचे इतर पदाधिकारी यांना विश्वासात न घेता जिल्ह्याध्यक्षांनी या नियुक्त्या केल्याचा आरोप करण्यात येत होता. मनसेचे शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती तर  पनवेल आणि नवीन पनवेल या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या कार्यकारणी होत्या.

पक्ष स्थापनेपासून दोन्ही शहर अध्यक्ष वेगळे होते. पण जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांचा मर्जीतील माणसाला पद द्यायचे या हेतूने त्यांनी दोन्ही ठिकाणी परस्पर पदे बहाल केली. याचा संताप इतर पदाधिकाऱ्यांना आला आणि त्यांनी दस्तरखुद्द राज ठाकरे यांच्याकडे गार्हाणे घातले. तेव्हा राज ठाकरे यांनी तालुका सचिव आणि पनवेल नवीन पनवेल शहर अध्यक्ष या दोन्हीं पदांना स्थगिती दिली. तसेच या दोन्ही ठिकाणी नव्याने घोषणा करण्यात येणार आहे. जुन्या पदांचा गैरवापर कोणी करू याने असे देखील आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

दरम्यान पनवेल शहर आणि परिसर वाढता आहे. शहराचे नागरीकरण देखील वाढते आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकच शहराध्यक्ष काम करणे अवघड असते. त्यामुळे पनवेल आणि नवीन पनवेल वेगवगळे पदाधिकारी अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.