Press "Enter" to skip to content

महाआघाडी शिष्टमंडळाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट

मालमत्ता कर आकारणी करू नये : आमदार बाळाराम पाटील यांची मागणी

सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी ।

कोरोना महामारीत पनवेल महानगरपालिकेने जनतेवर जाचक मालमत्ता कर लावला आहे, तेव्हा येथील जनतेच्या भावनांचा विचार करून जी काही भांडवलशाही चालविली आहे ती बंद करून मालमत्ता कर आकारणी करू नये अशी जोरदार मागणी आमदार बाळाराम पाटील यांनी केली.   

 पनवेल महानगरपालिका हद्दीतील जनतेवर पालिका स्थापनेपासून अन्यायकारक असा मालमत्ता कर लावला आहे. या कराला पनवेल जनतेतून तीव्र विरोध होत आहे. कोणत्याही परिस्थितीत पनवेल करांवर हा कर लावू देणार नाही असा निर्धार करत महाविकास आघाडीच्या वतीने आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या सोबत बैठक झाली.

यावेळी शिवसेना सल्लागार  बबनदादा पाटील,  पनवेल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आर सी घरत, पनवेल राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील,  पनवेल जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुदाम पाटील,  शिवदास कांबळे, नगरसेवक गणेश कडू, शेकापचे युवा नेते  विजय भोईर,  काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा निर्मला म्हात्रे,  काँग्रेस, लतीफ शेख शहर अध्यक्ष पनवेल उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिकेने येथील जनतेवर पालिका स्थापनेपासून लावलेला मालमत्ता कर जनतेवर अन्याय करणारा आहे . पनवेल महानगरपालिकेने भांडवलशाही सुरू केली ती जनतेच्या भावनांचा विचार करून बंद करावी असे आमदार बाळाराम पाटील यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना सुनावले तर सल्लागार बबन पाटील यांनी  कोविड रुग्णालय त्वरित चालू करण्यात यावे त्यासाठी लागणाऱ्या अंबुलन्स सिडकोकडून उपलब्ध करण्याची जबाबदारी माझी असेल असे त्यांनी सांगितले. यावेळी मा महापालिका आयुक्त श्री सुधाकर  त्यांनी पुढील आठवड्यात कोविड रुग्णालय चालू करण्याचे आश्वासन दिले.

पनवेल जनतेवर मालमत्ता कर संदर्भात सर्वपक्षीय नेते,महापौर, अधिकारी, सामाजिक संघटना व रहिवाशी यांची सयूंक्त बैठक लवकरच लावण्यात यावी अशी मागणी आमदार बाळाराम पाटील यांनी आयुक्त यांना केली ती लवकरच घेण्यात येईल अशी ग्वाही दिली. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.