Press "Enter" to skip to content

नांदगाव येथे सिडको मार्फत अडीच कोटींची विकासकामे

नांदगावात आली विकास गंगा : माजी आमदार मनोहरशेठ भोईर बनले भगीरथ

अंतर्गत काँक्रीट चे रस्ते, नळ पाईप लाईन, अंतर्गत गटारांच्या कामांचे भूमिपूजन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

पनवेल तालुक्यातील नांदगाव येथे सिडको मार्फत अंतर्गत काँक्रीट चे रस्ते, नळ पाईप लाईन, अंतर्गत गटारे अशी सुमारे अडीच कोटींची विकासकामे करण्यात येणार आहेत.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रयत्नाने ही विकासाची गंगा नांदगावात अवतरली असल्याने ते येथील नागरीकांसाठी आधुनीक भगीरथ ठरले आहेत.

आज या विकासकामांचे भूमीपूजन मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी पनवेल महानगरपालिका नगरसेविका दर्शना भोईर, सरपंच विजेता भोईर, शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, रोहिदास भोईर, शाखाप्रमुख हुद्दार, गणेश खुटले, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.