Press "Enter" to skip to content

नगरसेविका अरूणा दाभणे यांच्या प्रयत्नांना यश


तब्बल एक वर्षाच्या पाठपुरवठ्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात

सिटी बेल लाइव्ह । तळोजा । वचन गायकवाड ।

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील गावाच्या  मुख्य प्रवेशद्वाराजवळील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या बौद्ध स्मशान भूमीजवळील रस्ता ते दत्ता म्हाञे यांच्या घरा पर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

हा रस्ता कासाडी नदी व  कानपोली गावाला व पनवेला शहराला जोडला गेला आहे. या रस्त्यातून  भाजी व्यवसाय करणाऱ्या महिला व शालेय विद्यार्थ्यांची मोठी वद॔ळ असते. या परिसरात धुळीचे वातावरण निर्माण झाले होते. या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी मागच्या वर्षी अर्थात दिनांक 17 माच॔  2020 ला लेखी अर्ज स्वरुपात करण्यात आली होती. तब्बल एक वर्षानंतर 2021 मध्ये  स्थानिक नगरसेविका अरूणा दाभणे  यांच्या  प्रयत्ना यश आल आणि  या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला आज पासून सुरूवात झाली आहे.

यावेळी रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी  स्थानीक नगरसेविका अरूणा दाभणे युवा नेता किरण दाभणे व चिंतामणी कंपनीचे काॅन्ट्रेक्टर उपस्थित होते.
      

यावेळी देविचापाडा व कानपोली गावातील नागरिकांना स्थानिक नगरसेविका अरूणा किरण दाभणे यांचे विशेष आभार मानले. विकासाची गंगा खर्या अर्थाने देविच्यापाड्यात येयाला सुरवात झाली असा विश्वास या परिसरातील नागरिकांना वाटू लागला आहे.

प्रभाग क्रमांक दोन मधील देविचापाडा , डोंगरेपाडा, पालेखुद॔ या तीन गावाचा विकास जास्तीत जास्त कसा होईल. या तीन गावांच्या विकासकामाला कसा जास्त निधी उपलब्ध करता येईल अशा प्रयत्न मी सातत्याने करीत आले आहे. लवकरच या तीन गावात विकास कामाची गंगाच येईल असा विश्वास अरूणा किरण दाभणे नगरसेविका यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक दोन च्या नगरसेविका अरूणा दाभणे या एक कत॔व्यनिष्ठ नगरसेविका म्हणून काम करीत आहेत. आज देविचापाड्यामध्ये बौद्ध समाजाच्या स्मशान भुमीजवळील रस्त्याचे काम पूण॔त्वास येत आहे. त्याच बरोबर बौद्ध समाज मंदिराच काम व गावातील काही मुख्य रस्त्याची कामे सुद्धा

लवकरच सुरू होणार असल्यामुळे गावातील सव॔ समाजामध्ये आनंदाच वातावरण निर्माण झाल आहे.

करीष्मा गायकवाड, युवा काय॔कती

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.