Press "Enter" to skip to content

शासकीय अधिकारी भ्रष्टाचार करीत असल्याचा महादेव मोहिते यांचा दावा

ऐनघर ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारावराविरोधात ग्रामस्थ करणार लाक्षणिक उपोषण

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील श्रीमंत अशी समजली जाणारी ग्रुप ग्राम पंचायत ऐनघर, या ग्राम पंचायतील अनागोंदी कारभारात दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या अपहारास शासकीय अधिकारीच जबाबदार असल्याचा दावा माहिती ग्राम पंचायत माजी सरपंच तथा शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते महादेव गणपत मोहिते यांनी केला असून या विरोधात २२ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती रोहाच्या आवारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.

तालुक्यातील नामवंत आणि सुपरिचित असलेल्या ऐनघर ग्राम पंचायतीचा १४ वा वित्त आयोग,केंद्र सरकारकडून येणारा दीड कोटी निधी तसेच जनरल फंड एक कोटी ७२लाख असा मिळणारा निधी सन २०१९-२०२०या आर्थिक वर्षात जमा झाला परंतु हा निधी अनियमितपणे खर्च झाले असल्याचे मोहिते यांनी या बाबत चौकशी करत या तीन कोटी रुपयांमध्ये दीड कोटी रुपये चेकद्वारे सेल्फ, बेअरर, कॅश रक्कम काढून त्याचे खोटे मस्टर खर्ची टाकून खर्च केले असल्याचे मिळविलेल्या माहितीच्या अधिकाराखाली आढळून आले आहे .अर्ज करून मिळालेल्या माहितीमुळे या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितपणे खर्च करून अपहार होत असल्याचे समोर आणत मोठा गैरव्यवहार. यामुळे दिनांक १४/१/२०२० रोजी ग्रामपंचायतीचे रहवाशी नागरिक नितेश चंद्रकांत करंजे, २१/५/२०२० रोजी परशुराम भागोजी तेलंगे,दिनांक ३०/५/२०२० रोजी यशवंत नारायण हळदे ,३/९/२०२० रोजी दिनेश देवराम कातकरी २४/९/२०२० रोजी महादेव गणपत मोहिते अशा सर्वांनी विभागीय आयुक्त-कोकण विभाग(विकास शाखा) सीबीडी बेलापूर,यांच्याकडे सदरील अपहाराविषयी अपील अर्ज दाखल केले आहेत.

त्याच बरोबर सदर चे सर्व अर्ज उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत विभाग)जिल्हा परिषद रायगड अलीबाग यांच्याकडे देखील पाठवले असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सदरील सर्व अर्ज दिनांक १/६/२०२०पासून ऑक्टोबर २०२० पर्यंत चौकशीकामी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय रोहा यांच्याकडे पाठविले असल्याची आढावा माहिती सांगत चौकशी अधिकारी म्हणून श्री वायाळ साहेब (विस्तार अधिकारी)पंचायत समिती रोहा यांना नेमले आहे.परंतु दिनांक १/६/२०२० पासून आज पर्यंत चौकशी करून चौकशी अहवाल हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे पाठविला नसल्याचे म्हणत अधिकारी यांनी वेळेत चौकशी न केल्यामुळे आजपर्यंत दीड कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे तरी सुद्धा चौकशी करून घेत नाहीत, अहवाल पाठविला जात नाही त्यामुळे अनियमितपणे या ग्राम पंचायत मध्ये कारभार करीत आहेत याबाबत ग्रामपंचायतीला कोणत्याही सूचना नाहीत त्यामुळे अपहार हा वाढतच चाललेला आहे. यामुळे पुढे दिनांक१५/२/२०२० रोजी मा. गटविकास अधिकारी(पंचायत समिती रोहा)यांनी चौकशी अहवाल पाठविला. सदर अहवालामध्ये अनियमितपणा व कॅश,सेल्फ व बेअरर चेक काढून अपहार झाला आहे असा अहवाल पाठविला परंतु उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद रायगड)यांनी अपहाराची जबाबदारी निश्चित करून पाठवावी असे कारण देऊन अहवाल परत पाठवला त्यामुळे अधिक अनागोंदी कारभारात भर पडत चालल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

परंतु विस्तार अधिकारी वायाळ हे सदरच्या अपहाराची जबाबदारी निश्चित करण्यास विलंब करीत असल्याचे म्हणत असून यामुळे चौकशीस विलंब होत असल्याकारणाने ग्रामपंचायत ऐनघरमध्ये भ्रष्टाचार थांबत नाही आणि ग्रामनिधीच्या पैशाचा तसेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या १४ वा वित्त आयोगाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार वाढत चाललेला आहे.या अपहाराविषयी उपमुख्य कार्यकारी अधिकारी(रायगड जिल्हा परिषद)हे वर्षभर अर्ज करून गटविकास अधिकारी (पंचायत समिती रोहा)यांना आदेश करीत आहेत. परंतु संबंधित विस्तार अधिकारी हे कसून चौकशी करत नसल्याने दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.यासाठी महादेव गणपत मोहिते,दिनेश देवराम कातकरी, धर्मेंद्र ताया शिद,मंगेश देवराम लाड,प्रफुल कणघरे,निलेश साळवी, नितेश करंजे,विवेक हरपाल आणि ऐनघर पंचक्रोशी बेरोजगार संघटनेचे सदस्य इत्यादी या उपोषणास सहभाग घेणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.