Press "Enter" to skip to content

वहाळ गावात खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी

सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकूर ।

दर वर्षी वहाळ गावात शिवरायांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा केला जातो यावर्षी या कार्यक्रमास सुनिल तटकरे मा.मंत्री व रायगड चे खासदार यांची प्रमुख उपस्थीती लाभली.

संध्याकाळी ५:०० वाजता वहाळ बस स्टाॅप येथून गावातील शिवाजी महाराज पुतल्या पर्यंत शालेय विध्यार्थ्या नी गणवेशात ढोल ताशे व लेझिम्ं मध्ये मिरवणुक काढण्यात आली. यावेळी खासदार सुनिल तटकरे सह पाहुण्यांनी शिवाजी महाराजा च्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करुन अभिवादन केले.

सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, उरण विधान सभा अध्यक्षा भावना घाणेकर, पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, विश्वनाथ शेठ पाटील (जेष्ठ नेते शेकाप), राजेंद्र पाटील (संचालक मुंबई कृ ऊ बा समिती), माधव पाटील (जेष्ठ पत्रकार), संदीप पाटील (मा नगराध्यक्ष ), रविंद्र पाटील(जि प सदस्य ), भरत बालू पाटील, महादेव बालू पाटील, रमेश बालू पाटील, सुरेश बालू पाटील (मा सरपंच), नारायण शेठ घरत ( शेकाप पनवेल ता माजी चिटणीस), पूजा समीर पाटील सरपंच(सरपंच ), प्रशांत पाटील (मा सरपंच ), सीताराम नाईक (तंटामुक्त अध्यक्ष ), विजय शिरढोणकर (मा सरपंच तरघर), मो का मढ्वी, गणेश पाटील(मा उपसरपंच) आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.