शिव जयंती निमित्त विक्रांत पाटील यांचा “शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात” उपक्रम
शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, रयगडावरून आणली शिव ज्योत
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्यातर्फे शिवजयंती निमित्त “शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात” या वेगळ्या उपक्रमाद्वारे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत.आपण जे आज आपल्या स्वराज्यामध्ये स्वाभिमानाने जगू शकतो ते केवळ आणि केवळ आपल्या महाराजानंमुळेच. सात जन्मात ही भेटू शकणार नाही इतके प्रचंड उपकार आपल्या राजांचे आपल्यावर आहे त्यामुळेच आपल्यासाठी ते देवच. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे आपल्यासाठी सण व उत्सवच.


स्वराज्य निर्माण करण्यासाठी उभी आहेत संघर्ष करणाऱ्या महाराजांची जयंती घराघरात साजरी व्हावी याकरता शिवजयंती निमित्त विक्रांत पाटील यांच्या वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या अनोख्या उपक्रमाद्वारे महाराजांची एक आकर्षक मूर्ती प्रभागातील नागरिकांना भेट देण्यात आली आहे. जेणेकरून प्रभागातील नागरिक आपल्या घरात शिवजयंतीच्या दिवशी मूर्तीचे पूजन करून महाराजांना मानाचा मुजरा करून आपला श्रद्धाभाव व्यक्त करू शकतील.


या शिवजयंती निमित्त खास किल्ले रायगडावरून आणल्या जाणाऱ्या शिवज्योत चे दर्शन नागरिकांनी घेतले तसेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले होते.








Be First to Comment