आपले आपणासाठी
ना साद घालायची, कुणाला कशासाठी
जगायचे असेच, आपले आपणासाठी
ना करायचे काही, कसेसे कुणासाठी
विहारायचे असेच, आपले आपणासाठी
ना दुःख कसले, विसरायचे सुखासाठी
आनंदात जगावे, आपले आपणासाठी
ना हितगुज कसले, कुणाचे कुणापाशी
शांत एकांत असावे, आपले आपणासाठी
ना एकटे आपण, रामराया सोबतीसाठी
लीन व्हावे चरणावरी, आपले आपणासाठी
स्वानंद नंदकुमार मराठे, पुणे
Be First to Comment