Press "Enter" to skip to content

उलवे नोड येथे महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।

माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष उलवे व प्रशांत पाटील मित्र मंडळ उलवे यांच्या तर्फे महिलां साठी उलवे सेक्टर 20 येथे भव्य दिव्य अशा हळदी कुंकू समारंभा चे आयोजन करण्यात आले होते.

उलवे नोड ची स्थापना झाल्या पासुन प्रशांत पाटील यानी महिलां साठी विविध उपक्रम राबविले गेले.याचीच पोच पावती म्हणून या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माघी गणेशोत्सव निमित्त येथे भजना चा कार्यक्रम झाला. यावेळी बहुसंख्येने महिलानी गणेशाचे दर्शन घेउन हळदी कुंकू समारंभात हजेरी लाऊन वहाण घेतले.

सदर कार्यक्रमाला मा.जि.प.सदस्या सौ.सुरेखा पाटील, सरपंच सौ.पुजा समीर पाटील, ग्रा.प.सदस्या सौ. शैला गणेश पाटील, सौ.सोनाली खोत, सौ.शुभागी.(सामाजिक कार्यकर्त्या) या सोबत मुंबई कृ.ऊ.बा.स.संचालक राजेंद्र पाटील, तरघरचे मा.सरपंच विजय शिरढोणकर, मा.सरपंच वहाळ व सदस्य तथा शेकाप अध्यक्ष उलवे प्रशांत पाटील, आदर्श शिक्षक मो.का.मढवी, मा.उपसरपंच गणेश पाटील, दत्तात्रेय कोळी (मा.मुख्याध्यापक वहाळ ), गावडे मैडम आदी सह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.