कर्जत मधील 79 पथविक्रत्यांना कर्ज मंजूर
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कोव्हीड-19 सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा तातडीने प्रधान करण्यासाठी आवश्यकता आहे. त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पंतप्रधान स्वनिधी पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेपर्यंत शहरातील पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल 10 हजार कर्ज स्वरूपात बँकेकडून उपलब्ध केले जात आहे. आज पर्यंत नगरपरिषदेच्या माध्यमातून 79 पथविक्रेत्या लाभार्थींना कर्ज मंजूर झाली आहेत.
सदर योजना दिनांक 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वी शहरांमध्ये पथविक्री करत असलेल्या सर्व पथविक्रेत्यांना लागू असून पथविक्रेते एक वर्षाच्या परत फेड मुदतीसह 10 हजार पर्यंत खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. सदर अर्ज हे विनातारण असेल आणि विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी कर्जाची परतफेड करणारे फळविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील. सदर कर्जावर आरबी आयच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहतील. पथविक्रेत्यांनी विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी कर्जाची परतफेड केल्यास 7 % टक्के व्याज अनुदान मिळण्यास प्राप्त होईल. आणि सदर व्याज अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात तिमाही प्रमाणे जमा होईल. तसेच सदर योजनेमध्ये डिजिटल व्यवहार करणाऱ्यास विक्रत्यांना 1200 रुपये कॅशबॅकची सुविधा देण्यात येणार आहे.
अश्या योजनेसाठी नगरपरिषद हद्दीतील 400 पथविक्रेत्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. नगरपरिषदेस 356 चे उद्दिष्ट आहे. 270 अर्ज पोर्टल वर दाखल झाले आहेत, त्यापैकी 230 अर्ज मंजूर झाले आहेत, सर्व कागदपत्रांची पूर्तता असलेले अर्ज नगरपरिषदेच्या मार्फत पथविक्रत्यांची खाते असलेल्या त्या- त्या बँकेत मंजुरी साठी पाठवण्यात आले होते. आता पर्यत प्रत्यक्ष 79 पथविक्रत्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी कोरोना महामारीत 10 हजार रक्कम कमी नाही. शासनाच्या योजनेचा फायदा घ्या, ज्यांनी अर्ज केले नसतील त्यांनी अर्ज करा असे आवाहन त्यांनी केले आहे
.
Be First to Comment