आरोग्यमंत्र्यांची ती क्लिप फेक
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
राज्यात कोरोनाची दुसरी भयंकर लाट येतेय, असा इशारा देणारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होतेय. मात्र ही ऑडिओ क्लिप फेक असल्याचे समोर आले आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा नसल्याचे त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून सांगितले आहे.







Be First to Comment