सिटी बेल लाइव्ह । धर्माबाद ।
येथील मार्कंडेय मंदिरात महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. भागवतकार योगेश महाराज अग्रवाल यांच्या वाणीतून दुपारी 1 ते 4 या वेळात भागवत कथा ऐकण्याचा आनंद भाविकांनी घेतला. यानिमित्ताने रोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, होम हवन आणि पूजा अर्चा करण्यात आली. शेवटच्या दिवशी महर्षी मार्कंडेय ऋषी यांचा जन्मोत्सव साजरा करून सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.
भागवतकार योगेश महाराज अग्रवाल यांनी मार्कंडेश्वर सभामंडपासाठी मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर श्री लालू आरटवार, श्री सिद्राम गोविंदराव बंडेवार, सौ. आशाबाई नागभूषण दुर्गम, श्यामराव बिंगेवार, सदानंद तानुरकर, बालाजी दत्तराम बिंगेवार, गंगाधर गंगूलवार यांनी प्रत्येकी 51 हजार रु. देणगी देत असल्याचे जाहीर केले. तर हनमंलू सुरकूटवार 21 हजार रु आणि उदयकुमार जोशी व शक्कररोड यांनी प्रत्येकी 11 हजार रुपये देणगी जाहीर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंगाधर मारावार, सिद्राम बंडेवार, ऍड. किशनराव तानुरकर, रामलू पोनोड, धर्मन्ना जिंदमवार, श्रीराम गोविंदलवार, श्यामराव बिंगेवार, बालाजी मच्चेवार, लालन्ना शंकरोड, नरेश शिलारवार, साई सुरकूटवार, साईनाथ हिंगेवार, सदानंद तानुरकर, अशोक यमेवार, संजय गैनवार, नासा येवतीकर, रामकुमार चिलकेवार, साईनाथ सायबलू, मोहन पुलकंठवार, शरद तानुरकर, लक्ष्मण गादेवार, विठ्ठल सिरमलवार, बालाजी चिंतावार, ब्रह्मनंद मच्चेवार, सायन्ना क्यादरवाड, लक्ष्मण पेंडपवार, साईनाथ महाराज आदी समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. या भागवत सप्ताहाचे युट्युब वर थेट प्रक्षेपण करण्याचे काम रवी गंगाधर मारावार आणि निलेश गोविंदलवार या युवकांनी केले. सात ही दिवसांचे सुंदर असे नियोजन आणि सूत्रसंचालन सतीश कोडगिरे यांनी केले. यावेळी देणगीदारांचे महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.








Be First to Comment