नोटीस न देता कनेक्शन कट कराल तर याद राखा – भाई मोहन गुंड
सिटी बेल लाइव्ह । बीड । प्रतिनिधी ।
वीज बीलाच्या नावाखाली विद्युत महावितरण कंपनीकडून शेतीपंपाचे कनेक्शन कट करण्याचा बीड जिल्ह्यात सपाटा लावला आहे शेतकऱ्यांना नोटीस किंवा पूर्व सूचना कल्पना न देता विद्युत वितरण कंपनी वीज पुरवठा खंडित करत आहे या मुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेले पीक वाळून गेल्यास याला जिम्मेदार कोण एक वर्षा पूर्वी कोरोना सारख्या महामारीने शेतकरी आर्थिक संकटात आहे शेतकरी सध्या तरी पूर्ण पैसे भरू शकत नाही. शेतकरी वर्षभराचं बील भरतो मात्र त्याच्याकडे दोन ते तीन महिन्याच विद्युत पंप चालतात तरी ही महावितरणची आसी मनमानी सक्तीची वसुली वीज कनेक्शन कट करणे थांबवा अशी मागणी जिल्हाधिकारी मुख्यमंत्री विद्युत वितरण कंपनीकडे निवेदना द्वारे शेकापचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची वीज कनेक्शन करण्यात पूर्वी किमान 15 दिवसाची लेखी नोटीस महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना द्यावी तरच त्या संबंधित शेतकऱ्यांची विद्युत वीज पुरवठा खंडित करावा अन्यथा अचानक जाऊन विद्युत पुरवठा खंडित करु नका. नोटीस न देता वीज तोडल्यास याचे परिणाम महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना भोगावे लागतील. आचानक वीज तोडल्याने जनावरांचा गुरा ढोराचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अचानक वीज कनेक्शन कट करून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये.
बीड जिल्ह्यात वीज तोडणी थांबून तात्काळज्या गावातील वीज खंडित केली आहे त्या गावातील वीज तात्काळ पूर्ववत करा अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बीड जिल्हाभर महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड भाई भीमराव कुटे अर्जुन सोनवणे यांनी दिला आहे.








Be First to Comment