Press "Enter" to skip to content

नविन पनवेलमध्ये भाजपाला धक्का.

रायगड जिल्ह्यात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरूच : भाजपाच्या युवा तरुणांचा मनसेत पक्षप्रवेश !

सिटी बेल लाइव्ह । नवीन पनवेल ।

राज ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नवीन पनवेल शहरातील मनसेचे उप शहर अध्यक्ष व स्वयंरोजगार सेनेचे उप जिल्हा संघटक यतीन देशमुख मनविसे शहर अध्यक्ष अनिकेत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल परिसरातील अनेक भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हा अध्यक्ष अतुल चव्हाण, उप जिल्हा अध्यक्ष दीपक कांबळी , पनवेल तालुका सचिव अमोल पाटील,खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब, वाहतूक सेनेचे कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण, विभाग अध्यक्ष अविनाश गव्हाणकर, वाहतूक सेना तालुका चिटणीस सुजित सोनवणे,महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या तालुका अध्यक्ष वर्षा पाचभाई , नवीन पनवेल च्या महिला मनीषा देशमुख, महाराष्ट्र सैनिक अतुल जाधव, सतीश गायकर, राज क्षीरसागर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.