सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृवाखाली खारघर सेक्टर 35 येथे पक्ष प्रवेश चा भव्य दिव्य कार्यक्रम शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला.
मागील तीन वर्षापासून अथक परिश्रम करून विभागप्रमुख इम्तियाज शेख आणि उपशहर प्रमुख मंगेश रानवडे यांच्या प्रयत्नांतून सेक्टर 26 -36 खारघर मधील दीडशे पेक्षाही जास्त उच्चशिक्षित रहिवासी आणि महिलांनी भगवा ध्वज हाती घेवून शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
विविध क्षेत्रात पारंगत असलेल्या, तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करणार्या पदाधिकार्यांनी, उच्चशिक्षित व सरकारी विभागात पदाधिकारी असलेले रिटायर्ड जेष्ठ नागरिक, व विविध समाजाच्या महिला मंडळांनी, जाहीर रित्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. यात बंगाली, गुजराती, उत्तर भारतीय, पंजाबी, असे विविध प्रांतातील लोकांनी शिवसेना पक्ष हेच आजच्या घडीला उत्तम पर्याय असल्याचे मत दर्शविले. पक्ष प्रवेशाचे आयोजक मंगेश रानवडे उपशहर प्रमुख- खारघर , इम्तियाज शेख – विभाग प्रमुख, गुरु म्हात्रे उपशहर प्रमुख -ग्रामीण खारघर होते.
पक्ष प्रवेश करताना, त्या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, खारघर महानगर प्रमुख रामदास शेवाळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अवचित राऊत, खारघर शहर उप महानगर प्रमुख दिपक घरत, तसेच खारघर शहर प्रमुख शंकर शेठ ठाकूर तसेच शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी व युवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment