माघी गणेशोत्सवाचे औचित्य
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत आहे. पनवेल शहर आणि ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. भक्तिमय वातावरण गणेश मंदिरात आहे. आधी मंदीरापुरता मर्यादित असलेला माघी गणेशोत्सव आता सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पनवेलसारख्या ठिकाणी साजरा होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे घरगुती स्वरुपातही माघी गणेशोत्सव साजरा होत आहे.
पनवेलमधील अनेकांचं श्रद्धास्थान असलेलं ३२५ वर्षांचे पुरातन प्रसिद्ध “श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिरातर्फे पुढील वर्षभर डायलिसिसच्या प्रत्येकी 3 पेशंट्सना आठवड्यातून प्रत्येकी २-२ वेळा मोफत उपचार देण्यासाठी डायलिसिस सेंटर चालविणाऱ्या रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलला आज रुपये ५ लाख इतक्या देणगीचा चेक आज देण्यात आला.
यावेळी मंदिराचे अध्यक्ष मुरलीधर जोशी यांसह ट्रस्टी विजय जोशी, जगन्नाथ जोशी, ऍड प्रथमेश सोमण, आनंद काळे, शरद जोशी, श्रीराम वत्सराज तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलचे विलास कोठारी उपस्थित होते.








Be First to Comment