बौद्ध समाज मंदिराच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण : रातोरात कोणी बांधला झोपडा ?
सिटी बेल लाइव्ह । वचन गायकवाड । तळोजा ।
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन देविचापाडा बौद्ध समाजातील बौद्ध समाज मंदिराच्या मोकळ्या जागेवर रातोरात अतिक्रमण करण्यात आले आहे.
या संबधी तातडीने बौद्ध वाड्यातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता ते अतिक्रमण राञीच केले असल्याचे समजले. तेव्हा संबधीत पनवेल महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना या संबधी माहिती देण्यात आली असता ताबडतोब रविवारी प्रभाग क्रमांक दोन चे अधिकारी पगडे व बागडे यांनी पाहणी केली.
या पाहणीचा अहवाल अधिक्षक भंडारी यांना पाठवणार असल्याचे पगडे यांनी सागितले. तसेच या संबधी सर्व माहिती पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डाके यांना दिली असता त्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून या संबधीची चौकशीचे करण्या संदर्भात अतिक्रमण विभागाचे सहाय्यक उपायुक्त सचिन पवार यांच्याकडे हा विषय दिला असल्याचे सागितले. लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डाके यांनी दिले.
आज सकाळी 11.30 च्या सुमारास पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे व मालमत्ता विभागाचे प्रमुख अधिकारी सुनिल मानकामे यांनी घटनास्थळी पाहणी केली. या संबधात त्यांनी गावातील ग्रामस्थांकडून माहिती घेतली. योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन सुनिल मानकामे यांनी दिले.
प्रभाग क्रमांक 2 देविचापाडा येथील बौद्ध समाज मंदिराच्या मोकळ्याजागेवर देविच्यापाड्यातील एका व्यक्तीने दिनांक 12 फेब्रुवारी राञी रितोरात पञ्याचा झोपडा बांधून जुन्या बोगस घरपट्टीचा वापर करून नव्याने त्या झोपड्याला पनवेल महानगरपालिकेच्या पालेखुर्द कार्यालया मार्फत घर क्रमांक 730 देण्यात आला.
मुळात हि जागा समाज मंदिराची असून तीचा नविन क्रमांक 729 असून त्या मोकळ्या जागेचा हि त्यात समावेश आहे. समाज मंदिराच्या अॅसेसमेटच्या उतार्यावर त्या मोकळ्या जागेचा उल्लेख आहे. अस असताना पालेखुर्द च्या कार्यालयातील कर्मचारी हाताशी घेवून बौद्ध समाज मंदिर च्या मोकळ्या जागेला घर क्रमांक देण्यात आला. कोणी दिला हा घर क्रमांक ? रातोरात कोणी बांधला हा झोपडा?
समाज मंदिराच्या मोकळ्या जागेला 730 क्रमांक देण्यात आला. हा कोणी दिला ? हा घर क्रमांक कोणाच्या नावावर आहे ? याची चौकशी करावी अशी मागणी देविच्यापाड्यातील बौद्ध समाजाने केली आहे.

तसेच या संबधी पालेखुर्द कार्यालयाचे कर्मचारी एकनाथ म्हाञे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, बौद्ध समाज मंदिराला घर क्रमांक टाकत असताना मोकळ्या जागे संबधी कुष्णा गायकवाड यांना विचारले असता त्यांनी आमची जागा असल्याचे सांगितले . आमच्या या पञ्याच्या झोपड्याला घर क्रमांक द्या म्हणून हा घर क्रमांक देण्यात आल्याची कबुली एकनाथ म्हाञे या कर्मचार्यांनी दिली. देविचापाड्यातील देविदास गायकवाड यांच्या नावावर 730 घर क्रमांक असल्याचे दाखविले.यावरून समाज मंदिराच्या मोकळी जागा हडप करण्याचा प्रयत्न कोणी केला आहे हे स्पष्ट झाले आहे.
या बौद्ध समाज मंदिराचे नव्याने टेंडर पनवेल महानगरपालिकेकडून काढण्यात आले असून नव्याने मोठे बौद्ध समाज मंदिर बाधण्यात येणार आहे. मागच्या वर्षी जुन्या समाज मंदिराचे स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आले होते तेव्हा मोकळ्या जागेचा व जुन्या इमारतीचे मोज माप ही करण्यात आले होते. या जागेवर नविन बौद्ध समाज मंदिर उभे होतय हि बाब लक्षात घेवूनच कुठेतरी चांगल्या कामाला अडथळा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का ? मोकळी जागा हडप करण्याचा जाणूनबूजून पर्यंत केला जातो का ? हि वडिलोपार्जित समाज मंदिराची जागा असून त्या जागेवरील अतिक्रमण त्वरीत हटवा अशी मागणी देविच्यापाड्यातील बौद्ध वाड्यातील नागरिकांनी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या पञ्याच्या घरांची सखोल चौकशी करावी तसेच 730 हा घर क्रमाक रद्द करावा अशी मागणी केली आहे.

प्रभाग क्रमांक दोन मध्ये अशा प्रकारचे पञ्यांचे झोपडे जर रातोरात बांधले असतील तसेच असे किती झोपडे व कुठे बाधलेत याची माहिती 24 तासाच्या आत मला लेखी स्वरूपात द्या अन्यथा तुम्हाला कामावरून निलंबित केल जाईल अशी तंबी पनवेल महानगरपालिकेच्या पालेखुद॔ कार्यालयातील कम॔चार्यांना गुलवे मॅडम सहाय्यक आयुक्त मालमत्ता कर यांनी दिली.
वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त मालमत्ता कर विभाग
ज्या जागेवर अतिक्रमण केले आहे हि बाब निंदनीय आहे. त्वरीत हे अतिक्रमण हटविण्यात यावे व घरपट्टी क्रमांक रद्द करण्यात यावा. तसेच लवकरात लवकर नव्याने बौद्ध समाज मंदिर बाधण्यात यावा अशी मागणी केली आहे.
विश्वास गायकवाड, ग्रामस्थ देविचापाडा
समाजाच्या मालमत्तेवर अशा प्रकारच्या सुशिक्षित व्यक्तीने अतिक्रमण करणे व ताबा कब्जा आहे असे सांगणे चूकीचे असून ही बाबा निंदनीय आहे. हे अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे अशी मागणी केली आहे. जर लवकरात लवकर हे अतिक्रमण हटवले गेले नाही तर मोठ आंदोलन केल जाईल. समाजात भांडण व दुही माजवन्याच काम अशा समाज कंटकाकडून
केल जात आहे.
काशिनाथ गायकवाड, जेष्ठ ग्रामस्थ








Be First to Comment