सिटी बेल लाइव्ह । सांगली । सुनिल ठाकुर ।
आपल्या तिनवडे-आटपाडी गावातील नामदेव कटारे ,माथाडीचे नेते हे समाज सेवक माथाडी कामगार संघटनाची पत संस्थेचे चेअरमनपदी नियुक्ती झाली हे आम्हा तरुणांना अभिमानास्पद आहे.गावाकडील माणसांना संकटाच्या वेळी एकत्र आले पाहिजे व तरुणांना अहिल्यादेवी फंडा प्रमाणे मदत करावी असे तक्का येथील हनुमान मंदिर सभागृहात आयोजित समारंभात अशोक मेटे यांनी सांगितले.
अहिल्यादेवी फंड निबवडे ता.आटपाटी जिल्हा सांगली यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अशोक मेटे , कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगड भूषण जयपाल पाटील,सदाशिव खताल, सुरेश जाधव,अनिल चिबुलकर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांना फेटा व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.जालंदर मोटे यांनी पनवेल मध्ये कामानिमित्त आलेल्यानी11 वर्ष पूर्वी अहिल्यादेवी फंड स्थापन करून उद्दोग आणि शिक्षण साठी मदत केली जाते.
या वेळी सत्कार मूर्ती माथाडी नेते नामदेव कटारे म्हणाले की1985 साली मी राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलयझर थळ येथे कामा निमित्त येऊन मा.मनोहर कोतवाल यांच्या कामगार संघटना मध्ये आज पर्यंत आहे .कामगारांचे प्रश्न सोडवता संघटनेत उपाध्यक्ष पदा पर्यंत व आज230 कोटी च्या पतसंस्थेचे चेअरमन पदी निवड झाल्याने माझा सत्कार केलात त्या बद्दल फंड सदस्य याचा आभारी आहे,माझे शिक्षण कमी असले तरी कामगार अभ्यास दोऱ्या वर युरोप, अस्ट्रेलिया येथे जाऊन आलो माझ्या माथाडी बांधवाना घर,फ्लॅट घेण्यासाठी केव्हाही कर्ज मागणी करू शकता आपल्या समाजासाठी कायमची सेवा देईन असे त्यानी सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक मोटे, सदाशिव खताल,सुरेश जाधव यांचे मार्गदर्शन झाले तर कार्यक्रम अध्यक्ष रायगड भूषण जयपाल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनत आपली व कुटूंबाची सुरक्षितकाळजी कशी घ्यावी याची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्ताराम,नामदेव,मोहन, दादा,तातोबा मोटे,मधुकर खताल यांनी परीश्रम घेतले आभार श्रीकांत खताल यांनी मानले. फोटो-(विकास रणपिसे)-माथाडी नेते नामदेव कटारे यांचा सन्मान करतांना भाजपा जिल्हा चिटणीस अशोक मोटे,सोबत रायगड भूषण जयपाल पाटील,सदाशिव खताल, शिक्षणधिकारी आदी उपस्थित होते.








Be First to Comment