सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाच्या काळात कामगार क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल कोविड योद्धे म्हणून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते कामगार नेते महेंद्र घरत यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सकाळ समूहाचे मुख्यसंपादक प्रतापराव आदी उपस्थित होते.
कोरोना काळात कामगार नेते महेंद्र घरत यांनी केलेल्या कार्याची दखल सकाळ वृत्तपत्राने घेऊन त्यांना सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.








Be First to Comment