सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ सल्लागार मा.श्री.निलेश सोनावणे यांचा वाढदिवस साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था नवीन पनवेल येथे जेष्ठ नागरिकांच्या सोबत साजरा करण्यात आला.
वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिकांसोबत निलेश सोनवणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिकांनी निलेश सोनवणे यांना भरभरून आशीर्वाद दिले. वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट वाटप देखील यावेळी करण्यात आले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष केवल महाडिक, मंदार दोंदे, ऍड. मनोहर सचदेव व ओंकार महाडिक यांच्यासह वृद्धश्रमाचे किरण पाटील, ज्योती पाटील उपस्थित होते.














Be First to Comment