शो बाजीसाठी समाजसेवा करणार्यांनी हा व्हिडिओ पहायलाचं हवा !
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । सुनिल ठाकुर ।
ठाणे येथील आशा द लाईफ ऑफ़ होप फाऊंडेशन च्या वतीने रस्त्यावरील भिकारी अनाथ व्यक्तींची सेवा करण्या चे महत्वपूर्ण कार्य गेली वर्षभर सुरु आहे.पनवेल शहरातील बसस्थानक समोर असलेल्या उड्डाण पला खाली असलेले .व रेल्वे स्टेशन परिसरात असलेले भिकारी यांचे वाढलले केस व दाढी करुन त्याना नीट नेटके बनविण्याचा उपक्रम राबवित आहेत.त्याच प्रमाणे काही भिकारी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलेत त्याना मलम पट्टी करुन औषधे दिली.त्याच प्रमाणे त्याना अन्ना ची पॉकीटे व पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या .यावेळी अनेक भिकार्यांची ईश्वर कृपेने सेवा करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ.राणा हिरा यानी सांगितले .
यावेळी बिपीन प्रसाद .पूनम माझी.सौ.मनिषा.पुजा.प्रीती .सुरेखा सुनिल घोरपडे आदी उपस्थित होते.








Be First to Comment