शिवसेनेतर्फे १५ दिवस मोफत ई.सी.जी, ॲंजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, किडनी स्टोन यावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, व खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा होरायजन प्राईम हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन.
खा.डॉ.श्रीकांतजी शिंदे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा होरायजन प्राईम हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता सलग १५ दिवस मोफत ई.सी.जी, ॲंजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे सलग १५ दिवसीय महाआरोग्य शिबिर येत्या गुरुवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२१ ते दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी दररोज सकाळी १० ते दुपारी ४ वा या वेळेत होरायजन प्राईम पातळीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे.तरी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि जवळपासच्या सर्व नागरिकांनी १५ दिवस विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि होरायजन हॉस्पिटल, ठाणे यांनी केले आहे. वेळेअभावी नोंदणी न करू शकल्यास थेट शिबीर स्थळी केसपेपर काढून तपासणी करता येईल, अशी माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
मंगेश चिवटे( मो.९८५१२३१५१५)
कक्षप्रमुख
माऊली धुळगंडे
८९०७७७६००२
राम राऊत
८९०७७७६००४
शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष कार्यालय 0222532567


Be First to Comment