क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या अध्यक्षा सौ.रुपालीताई शिंदे यांचा पुणे येथे समाज गौरव पुरस्काराने सन्मान
सिटी बेल लाइव्ह । पुणे ।
पनवेल मधील समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पत्रकार तसेच क्रांतीज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ. रुपालीताई शिंदे यांचा नावलौकिक आहे. समाजात प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्यांना त्या सढळ हाताने मदत करीत आहेत व सर्वसामान्यांच्या मनात आपुलकीचे स्थान मिळवत आहेत. याचीच दखल घेत चाकण मार्केट यार्ड पुणे, सुचित्रा सांस्कृतिक हाँल याठिकाणी
मानवाधिकार मीडिया फॉउंडेशन मानवाधिकार मीडिया च्या वतीने सौ.रुपाली ताई शिंदे यांना केंद्रीय मानवाधिकार संघटन, नई दिल्ली राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. दत्ता कंद पाटील यांच्या हस्ते शाल,प्रमाणपत्र व समाज गौरव पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री. शेखर घोगरे मा. नगराध्यक्ष, चाकण, श्री. संदिप ढमाले निवृत्त कमांडर (बी.एस.एफ. ), श्री. सुदाम तळेकर संस्थापक – धर्मवीर ग्रुप, डॉ. किशोर घुमटकर मा. तालुका प्रमुख डॉक्टर सेल शिवसेना, भिमकन्या दिपाली कांबळे,भिमाईची लेक सारिका शिंदे, श्री. दत्ता कंद पाटील.
( राष्ट्रीय उपाध्यक्ष – केंद्रीय मानवाधिकार संघटन, नई दिल्ली.), ऍड प्रीतम रामदास शिंदे पा महाराष्ट्र प्रदेश महासचिव, कु.नम्रता कुदळे अध्यक्षा – छावा संघटना, युवती, चाकण ग्रामस्थ तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment