Press "Enter" to skip to content

अंधांच्या डोळ्यात तरळले कृतज्ञतेचे अश्रू

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व्यक्तींना आर्थिक मदत

सिटी बेल लाइव्ह । बदलापूर ।

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष मा.श्री. जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवलदादा यांच्या संकल्पनेतून “नॅशनल फेडरशन ऑफ विजूअल इम्प्याड पर्सन “या बदलापूर – वांगणी येथील अंध व्यक्तींच्या संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी जितुकाका यांचा वाढदिवस अंध व्यक्तींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.

सदर अंध व्यक्ती या रेल्वेमध्ये कटलरीचे सामान विकुन आपला उदरनिर्वाह करीत असत मात्र लॉकडाऊननंतर रेल्वे बंद असल्याने त्यांचा व्यवहार ठप्प झाला व त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते याची जाणीव ठेवूनच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे आर्थिक मदत करण्यात आली. 

यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, सहचिटणिस केवल महाडिक, सचिन लोखंडे, महिला महाराष्ट्र अध्यक्षा अर्चना पार्टे, नवी मुंबई अध्यक्ष डॅनी डिसोझा, कोपरखैरणे विभाग अध्यक्ष मनोज चव्हाण, ठाणे जिल्हा सचिव सुभाष गजरे, बदलापूर उपाध्यक्ष अक्षय भोसले ओमकार महाडिक आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.