आठवणीतली थंडी
आठवते ती
थंडी बालपणीची
कडक पाण्याने
पळून ती जायची
शेकोटीच्या भोवती
मजा खूप यायची
शेकोटीच्या आगीत
होरपळून ती जायची
गोधडीला पण किती
ती घाबरायची
बाहेर येताच मात्र
हुडहुडी भरायची
हुरडा, बोरे, डहाळा
किती तो खायचा
रानोमाळ फिरताना
उत्साह असायचा
नव्हती जबाबदारी
थंडी ती अल्लड होती
बालपणीची मजा
आठवणी छान किती
सौ.विजया चिंचोळी.
खारघर, नवी मुंबई.
Be First to Comment