Press "Enter" to skip to content

खोपोलीत अविष्कार फाऊंडेशन इंडियाच्या वतीने पत्रकारांचा गुणगौरव

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

सर्वत्र ठिकाणी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन उत्साहात संपन्न झाला असून खोपोली शहरात अविष्कार फाऊंडेशन इंडिया, सामाजिक व शैक्षणिक संस्था खालापूर तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा करीत यावेळी खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील पत्रकार मंडळीचा गुणगौरव करीत त्यांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देत अथोचित सत्कार करण्यात आल्याने सर्व पत्रकार मंडळींनी अविष्कार फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

याप्रसंगी खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता औटी, गटनेते तथा शिवसेना शहरप्रमुख सुनिल पाटील, नगरसेविका वनिता काळे, शिवसेना नेते हरेश काळे, अविष्कार फाऊंडेशन खालापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र फक्के, उपाध्यक्ष प्रशांत गोपाळे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोरे, सेक्रेटरी जितेंद्र देशमुख, महिला संघटक कविता खोपकर, ताराराणी ब्रिगेड खालापूर तालुका अध्यक्षा वर्षा मोरे या प्रमुखासह मोठ्या संख्येने पत्रकार बंधू – भगिनी उपस्थित होते

पत्रकार क्षेत्रात आपल्या लेखणीतुन वेळप्रसंगी भूक तहान विसरून तर कित्येक वेळा कुटूंबाला वेळ न देता पीडित समाजाला मदत करून अन्यायाविरुद्ध लिखाण करून समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याने पत्रकारांच्या कामगिरीचा गौरव व्हावा या दृष्टीने ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य आविष्कार सामाजिक व शिक्षण फाऊंडेशन खालापूर शाखेच्या वतीने पत्रकार मंडळीचा सन्मान करीत गौरवण्यात आल्याने पत्रकार मंडळीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

यावेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी आपल्या विचारातून समाजात घडणाऱ्या घटना निर्भीड पणे लिखाण करावे आणि पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू असे आश्वासन दिले तर उपनगराध्यक्षा विनिता कांबळे यांनी आपल्या विचार व्यक्त करताना समाजात घडणाऱ्या घटना पत्रकारामुळेच कळतात तर लोकप्रतिनिधी च्या कामाचा आढावा देताना चुकीची दुरुस्ती करता येत असल्याचे सांगितले तर गटनेते तथा शिवसेना शहरप्रमुख सुनिल पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, आमच्या सारख्या राजकीय नेत्याची कारकीर्द ही ठराविक काळापुरती असते परंतु पत्रकार मंडळीनी मिळवलेली पदवी ही पूर्ण आयुष्यासाठी असते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, खोपोलीत लवकरच पत्रकार भवनासाठी जागा आरक्षित करून पत्रकार मंडळींना हक्काची जागा देण्यात असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.