Press "Enter" to skip to content

बोटकी वाडीत जंगल वाचवा-वणवा थांबवा जणजागृती अभियान

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी ।

गुरुवार दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी चिर्ले गावठण तालुका उरण येथील बोटकी वाडीत राजिप सदस्या कुंदाताई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वणव्या पासुन आपल्या वनांचे रक्षण व्हावे याकरिता जणजागृती अभियान कार्यक्रम संपन्न झाला.

वनविभाग अलिबाग आणि वनपरिक्षेत्र उरण यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आले. वनविभागाचे वनरक्षक सुदाम धांडे आणि पक्षीमित्र आनंद मढवी यांच्या अथक प्रयत्नाने सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.
जंगलात जाणुन बुजून आग लावणाऱ्यास कोणत्या कडक कारवाईस सामोरे जावे लागेल ह्याबाबत ही सुचना देण्यात आले. यावेळी बोटकी वाडीच्या नागरिकांनी जंगल वाचवण्याचे निर्धार करुन वनविभागास वेळोवेळी सहकार्य करू असे मत विश्रांती घरत यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी माजी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे पाणदिवेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे नंदेश ठाकूर, गणेश मढवी ,स्मिता पाटील आदि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.