Press "Enter" to skip to content

ह.भ.प.पांडूरंग भोकाजी घरत यांचा ९४ वा वाढदिवस साजरा

सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी ।

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसांचे आयुष्यमान कमी होत चालले आहेत. त्यात कोरोना महामारीचे संकट असतानाही ह.भ. प. पांडुरंग भोका घरत यांचा ९४ वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला.

मुल उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर उच्च राहणीमानाचा पेहराव आल्याने जुन्या सरणीच्या आई वडिलांचा त्यांना विसर पडतो. आई वडीलांना त्यांच्या उतार वयामध्ये त्यांना आधार देण्याऐवजी त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे पसंद करतात.

आईवडिलांचे कर्तुत्व हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनन्य साधारण असे महत्वअसते. कारण आई म्हणजे एखाद्या कुटुंबाला प्रकाश देणारी ज्योत असते तर त्याच ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा हा बाप असतो हे आताची पिढी विसरली आहे.

परंतू चिर्ले येथील निळकंठ घरत, शिवदास.घरत व सदानंद घरत व भार्गव घरत या मुलानी आपले वडिल ह.भ.प. पांडूरंग भोकाजी घरत यांचा ९४ वा वाढदिवस साजरा करुन समाजातील सर्व तरुणांना पिता पुत्राच्या प्रेमाचा संदेश संपुर्ण समाजाला दिला आहे.यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरानी ह.भ.प.पांडुरंग घरत याना वाढदिवसाच्या शुभेछा देऊन ओंमकार सांस्कूतिक भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.