कोलाड पोलिस ठाण्यात निवेदन सादर
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरला गडकोट,पर्यटनस्थळे व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान, व पाटर्या कारणे यांस प्रतिबंद करण्याचा आदेश काढण्या बाबत कोलाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुभाष जाधव यांना हिंदू जनजागृती समिती मार्फत निवेदन देण्यात आले.
हिंदू जनजागृती समिती हि राष्ट्ररक्षण व धर्मजागृती करणारी सेवाभावी संस्था आहे.हि समिती सार्वजनिक उत्सव व इतर कार्यक्रमात होणाऱ्या गैरप्रकाराबद्द्ल उदा० राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतिके व मानचिन्ह यांची विटंबना रोखणे,फटाक्यांमूळे होणारे ध्वनी व वायु प्रदुषण रोखणे,व देवतांची विटंबना थांबविणे अशा विविध विषयांवर १८ वर्षा पासून जनजागृती करीत आहे.
अनेक गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रना यांना सहाय्यही करीत आहेत. गेली काही वर्ष भारतात पाश्चात्त्य कुप्रथांचे अंधानुकरण करणे अतिशय वाढत चालले आहे.त्यातील एक नवं वर्षे गुडी पाडव्याला साजरे न करता ३१डिसेंबर च्या मध्यरात्री साजरा करण्याची हि क्रुप्रथा!या रात्री मोठया प्रमाणावर धुम्रपान,मद्यपान, अंमली पदार्थ्याचे सेवन केले जाते याचबरोबर रात्रभर फाटाकाची अतिशबाजी करून ध्वनी प्रदुषण केले जाते याचबरोबर तसेच मद्यपान करून वाहन चालवून अपघात होतात यामुळे प्रशासन व पोलीस यांच्यावर अतिरिक्त ताण येतो यासाठी ३१डिसेंबर रोजी मद्यपान धुम्रपान,यावर प्रतिबंद घालावा यासाठी हिंदू जनजागृती समितीने कोलाड पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे.
यावेळी चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे,संजय लोटणकर, प्रवीण शिंदे उर्फ अबा शिंदे, विजय बोरकर, दिनेश खराडे व हिंदू जनजागृती समितीचे सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment