नाताळाच्या सुट्टीच्या निमित्ताने मुंबईतील नागरिकांचे “चला शुद्ध हवा घेऊ या” अभियान
सिटी बेल लाइव्ह । आरोग्य प्रतिनिधी ।
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर), २०१९ च्या आकडेवारी नुसार भारतामध्ये १७ लाख नागरिकांचा वायू प्रदूषणासंबंधित आजारांमुळे मृत्यू झाला असून हे प्रमाण एकूण मृत्यूच्या १८ टक्के इतके आहे. या आकस्मित मृत्यूमुळे आपल्या राष्ट्राच्या जीडीपी मध्ये २. ६ लाख करोडचे ( १.४ टक्के ) नुकसान झाले आहे. दिल्ली पाठोपाठ पुणे मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहंसरात वायू प्रदूषण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नाताळाची सुट्टी सुरु झाली असून मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातील अनेक नागरिक आपल्या गावच्या ठिकाणी तसेच शुद्ध हवेच्या शोधात निघाल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.
मुंबईत ५ अत्याधुनिक हॉस्पिटल असणाऱ्या बोरिवली येथील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या समूहाने केलेल्या एका निरिक्षणात मुंबईत रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढत असलेल्या वायू व ध्वनी प्रदूषणाला कंटाळून अनेक मुंबई , नवी मुंबई व ठाण्यातील नागरिक पुद्धेला ८ दिवस शुद्ध व प्रसन्न वातावरणाच्या सानिध्यात जाणार असल्याचे दिसून आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे छातिरोग -फुफ्फुसविकारतज्ञ डॉ. जिग्नेश पटेल म्हणाले म्हणाले, ” आजमितीला इंटरनेट व सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आपल्या आरोग्याविषयी जागृती झाली आहे, मुंबईत वाढणारे वायू प्रदूषण हे येणाऱ्या काळातील एक गंभीर समस्या असणार आहे व याचा सामना करण्यासाठी आपल्या सर्वानाच प्रयत्न करावे लागणार आहेत. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना लॉकडाउन मुळे नागरिकांमध्ये लोकप्रिय झाली झाली असल्यामुळे भविष्यात यामुळे वायू प्रदूषण कमी होईल. सध्या मुंबईत मेट्रोची कामे, थंडीमुळे आलेले धुके व या धुक्यामध्ये वाहनातील धूर मिसळल्यामुळे धुरके तयार होत आहे परिणामी ‘सीओपीडी’सारखा आजार होण्याची शक्यता वाढते त्याशिवाय अन्य आजारही होत आहेत. घराबाहेर वायू प्रदूषणासोबतच घरात जाळला जाणारी धूप, अगरबत्ती यामधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. रात्री घरात लावण्यात येणाऱ्या मच्छर अगरबत्तीमुळे रात्री ते सकाळी सहा या दरम्यान मोठा धूर होतो. तो धूर श्वासावाटे शरीरात जातो व त्यामुळेही अनेक आजार होतात. गेल्या महिन्याभरात आमच्याकडे आलेल्या अनेक रुग्णांनी या महिन्याच्या अखेरीस मुंबईच्या बाहेर जात असल्याचे सांगितले असून यामध्ये विशेषतः दम्याचे आजार व श्वसनविकार असलेल्या नागरिकांचा सहभाग होता.

दरवर्षी हिवाळ्यामध्ये मुंबई व लगतच्या शहरातील १५ ते २० टक्के नागरिक कमी प्रदूषित असलेल्या शहरात जातात, या वर्षी हे प्रमाण तितकेच आहे.”
नवी मुंबईत निर्माण झालेल्या आणीबाणी परिस्थितीचे अवलोकन करताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व जेष्ठ फिजिशियनव व छातिरोगतज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ सांगतात, ” काही दिवसापूर्वी नवी मुंबईतील तळोजा, खारघर तसेच बेलापूर येथील नागरिकांना वाढत्या वायू प्रदूषणामुळे मॉर्निंग वॉक न करण्यासाठी सांगितले गेले होते यावरूनच मुंबई व लगतच्या परिसरातील सध्यस्थिती समजून येते. नवी मुंबई व ठाणे शहरात शहरात औद्योगिक प्रदूषण वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामधून विषारी घातक पदार्थ बाहेर पडून हवेत मिसळतात.
रस्ते सफाई, वणवा पेटविल्याने प्रदूषण होते. वाढत्या प्रदूषणामुळे कर्करोगासह अन्य आजारांनादेखील निमंत्रण मिळत आहे. सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोक्साइडच्या संसर्गामुळे गुणसूत्रातील बदल होऊन कर्करोग होण्याची भीती निर्माण होऊ शकते. चोवीस तास धूर ओकणारे कारखाने आणि रस्त्यांवरील वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढतच चालली आहे. शेतकर्यांकडून जमिनीतील पिकांचे बुडखे जाळण्याचे प्रकार असोत वा बेसुमार वृक्षतोड असो, यातील कोणतीही गोष्ट कमी होताना दिसत नाही. खरे तर या बाबतीत एकटे सरकार काहीही करू शकत नाहीत. सर्वसामान्य लोकांची साथ आणि समजूतदारपणाची जोड त्यासाठी आवश्यक आहे.”








Be First to Comment