एमआयडीसीकडून तात्पुरते पंप बंद
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
दांड-रसायनी रस्त्यावरील रिस पुलाजवळील पाताळगंगा नदिकडे जाणा-या नाल्यात कोणतेतरी घातक रसायन पाण्यात मिसळल्याने कालणवाडी ते रिसपर्यंत वाहणा-या नाल्यात हजारो मासे मृत पडल्याचे दिसून आले.सदर घटना एमआयडीसीला समजताच पाणीपुरवठा विभागाचे अमोल मसुरकर यांनी खबरदारी घेत आपल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले.व तात्पुरते पाणीपुरवठा पंप बंद ठेवण्यास सांगितले.व नंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला कलविले.

रिस पुलाजवळील नाल्याच्या पाण्याला दुषित पाण्याचा फटका बसल्याने हजारो मासे मृत् झाले आहेत.हे मासे पाण्यावर तरंगून मृतावस्थेत पडलेले दिसत आहेत. मृतावस्थेत पडलेले मासे पाहण्यासाठी रिस पुलावर सकाळपासूनच चार वाजेपर्यंत बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.








Be First to Comment