सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण, आरोग्य व क्रीडा सुधाकर घारे यांच्या हस्ते हालीवली गावातील २४ लाखांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
दिलेला शब्द पुरे करणारा लोकप्रिय नेता म्हणून ओळख असणारे सुधाकर घारे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत हालीवली येथील विविध विकास कामांसाठी २४ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे, या सर्व कामांचे भूमिपूजन पार पाडले, गावात होत असलेल्या विकास कामांमुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यामुळे हालीवली गावाचा कायापालट होणार असून नागरिकांना उत्तम प्रकारचे रस्ते व गणपती बापाच्या विसर्जनासाठी विसर्जन घाट बांधण्यात येणार आहे, याप्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, नगरसेवक शरद लाड, ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण, बळीराम देशमुख, अस्पाक कर्णेकर, सरपंच, सदस्य , तंटामुक्ती अध्यक्ष, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment