खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रत्नाकर म्हात्रे यांच्या तर्फे लेखी निवेदन
सिटी बेल लाइव्ह । रायगड । रमेश थळी ।
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची अनेक वर्षा पासून टंचाई होत आहे या मध्ये कोप्रोली जिल्हा परिषद मधील गावासह आवरे गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे अशी मागणी सात त्याने गावकरी करत होते परंतु या कडे दुर्लक्ष होताना दिसत होते याचे गांभीर्य लक्षात घेऊन आवरे गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तांत्रिक कामगार संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर म्हात्रे यांनी रायगड जिल्हाचे खासदार सुनील तटकरे व पालक मंत्री आदिती तटकरे यांना लेखी निवेदन सुपूर्त केले.
या निवेदनात असे नमुद केले आहे की सध्या तालुक्यातील पूर्व विभागाला रानसयी धरणातुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने ते पाणी शुद्ध नाही त्यामुळे गावातील गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी गावाच्या बाजूने हेटवने धरणाची जल वाहिनी आहे त्या वाहिनीतून कोप्रोली जिल्हा परिषदेतील गावांना वआवरे गावाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी करत आहोत जेणेकरुन पूर्व भागातील गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल असे नमुद केलेले लेखी निवेदन त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री अदीती तटकरे यांच्या कडे सुपूर्त केले या निवेदनाच्या प्रति जयंत पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्रराज्य, उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार,रायगड जिल्हाच्या पालक मंत्री अदीती तटकरे यांना रवाना केल्या आहेत अशी माहिती रत्नाकर म्हात्रे यांनी दिली








Be First to Comment