सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
मागील आठ दिवसांपासून वातावरणात हळू हळू बदल होऊ लागल्याने तापमानाचा पारा खाली आल्याने थंडीचा कडाकाही वाढू लागला.पर्यायाने ऊबदार कपड्यांनाही मागणी वाढू लागली आहे.
गत वर्षाच्या मानाने या वर्षी थंडीचे आगमन दिवाळी सणाच्या प्रारंभीच झाल्याने थंडीची प्रतिक्षा करावी लागली नाही. तर सध्या थंडीचा जोर हळूहळू वाढू लागल्याने जनजीवनावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. थंडी बरोबरच अधून मधून धुकेही पडू लागल्याने तापमानात बदल होऊ लागला आहे. दीपावली सणाच्या आगमन बरोबरच थंडीचेही आगमन झाल्याने परंतू या वर्षी मात्र थंडीचा मोसम बराच पुढे ढकलल्याने सुरूवातीपासूनच वातावरणात कमालीचा गारवा जाणू लागल्याने हळू हळू थंडीचा जोरही वाढू लागला आहे.
गेल्या आठ दिवसापासून तर कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. त्यातच दिवसभर वातावरणात गारवाच राहत असल्याने वयोव्रुद्ध मंडळी,लहान मुले व थंडी तापाच्या रूग्णांना मात्र या थंडीला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी थंडीचा मोसम आणि शरीराला ऊब मिळविण्यासाठी ठिकठिकाणी पेटविल्या जाणाऱ्या शेकोट्या यांचा असणारा ऋणानुबंध यावर्षी मात्र थंडी संपत आली तरी दिसून आला नाही. परंतू आता मात्र थंडीचा कडाका वाढू लागल्याने शरीराला ऊब मिळवून देणाऱ्या शेकोट्याही आता पेटू लागल्या आहेत.








Be First to Comment