Press "Enter" to skip to content

नागोठणे विभागातील निवडणुका शांततेत पार पडणार असल्याचे संकेत

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

नागोठणे विभागातील पळस, कोंडगाव, वरवठणे आदी ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी होत आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत निवडणूक अर्ज दाखल करणे तसेच २ डिसेंबर रोजी उमेदवारांचे अर्ज छाननी करणे व चिन्ह वाटप करणे त्यानंतर ३ जानेवारी पासून निवडणूक प्रचाराची धामधूम चालू होणार आहे.

नागोठणे विभागात महाआघाडी मार्फत एकत्रितपणे निवडणूक लढवाव्यात असे आवाहन आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले असून या आवाहनाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते शिवराम शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागोठणे विभागातील चारही ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे.

यासंदर्भात शिवराम शिंदे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, महाआघाडी मार्फत निवडणूका लढल्यास कुठल्याही प्रकारची कटुता निर्माण होणार नाही. ग्रामपंचायत निवडणूकीत कुटुंबाकुटुंबात कटुता निर्माण होत असते. ही कटुता टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या निवडणुका महाआघाडी मार्फत लढणे ही काळाची गरज आहे. शिंदे पुढे म्हणाले की आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर विकासासाठी सर्वांची साथ असणे गरजेचे आहे म्हणून निवडणुका महाआघाडी मार्फत एकत्र लढल्या पाहिजे असे मत शेवटी शिवराम शिंदे यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.