Press "Enter" to skip to content

ठेकेदार व खारलाईन च्या अधिकार्यांचा मनमानी कारभार

११ गाव शेतकरी संघटना कुसुंबळे अध्यक्ष राजाभाई केणी व पदाधिका-यांवर पूर्वनियोजितपणे केला पोयनाड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग ।

स्थानिकांना किंवा शेतक-यांना काम दिलेच पाहिजे असा कायदा नाही असे म्हणत शेतकरी अन्नदात्यालाच बाजूला करण्यात आले आहे.

कितीही अडचणी आणल्या तरी शेतक-यांना न जुमानता शेतक-यांच्या विरोधात जावून काम करुन दाखविण्याची धमकीवजा चेतावणी नुकतीच शेतक-यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविणारे शिवसेना अलिबाग प्रमुख तसेच ११ गाव शेतकरी संघटना कुसुंबळेचे अध्यक्ष राजाभाई केणी यांना मनमानी कारभार करणा-या नेते व दादागिरी करणा-या ठेकेदारांकडून देण्यात आली.

याबाबत वृत्त असे कि, पिटकिरी, काचळी, कातळपाडा, वाघविरा  या गावांची खाडीलगत असणारी शेतजामीन ही खारलँडच्या प्रकल्पासाठी गेली आहे हा व्यवहार होत असताना शेतक-यांना विश्वासात न घेता  शेतक-यांच्या जमिनींवर खारलँडचे शिक्के बसविले गेले आहेत त्यानंतर सद्य स्थितीत शेतक-यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी खारजमिनिच्या योजनेस आमचा विरोध नाही परंतू ठेकेदार व संबंधित पदाधिका-यांनी शेतक-यांच्या ७/१२ वर पडलेले शिक्के काढून शेतक-यांना ७/१२ कोरा करुन द्यावा व सरकारी नियमाप्रमाणे योग्य तो मोबदला देण्यात यावा अशा प्रमुख अटी ठेवून तयार केलेले निवेदन मागील काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना देण्यात आले व शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा करण्यात आली होती परंतू निवेदन दिल्यानंतरही पदाधिकारी व नेत्यांकडून  कोणतेच सूत्र हलविण्यात आले नाही उलट शेतक-यांची बाजू मांडल्याबद्दल अलिबाग शिवसेना तालुका प्रमुख तसेच ११ गाव शेतकरी संघटना अध्यक्ष राजाभाई केणी यांना नेत्यांकडून व ठेकेदारांकडून दुरध्वनीद्वारे संपर्क करुन दबाव टाकून धमकीवजा चेतावणी दिली जात आहे.

इतकेच नव्हे तर ठेकेदारांनी  शेतक-यांना न जुमानता त्यांच्या विरोधात जावून काम सुरु केले असता जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतक-यांना शिविगाळ करुन स्वत:च स्वत:च्या गाड्यांच्या काचा फोडून शेतक-यांना अडकविण्याच्या हेतूने पोयनाड पोलिस स्टेशनमध्ये जावून अध्यक्ष राजा केणी व इतर पदाधिकारी अशा १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन शेतक-यांना न्याय मिळवून न देता स्वत:चा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशाने केलेले हे दुष्कृत्य अतिशय निंदनीय असून सर्व स्तरातून व शेतकरी वर्गाकडून ठेकेदार, पदाधिकारी, पोलिस प्रशासन व नेते यांच्याविषयी तिव्र संताप व्यक्त केला जात आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.