नियोजन शून्य,शेतकऱ्यांसाठी पाण्याचा पत्ताच नाही, खात्याची समस्या कायम
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा तालुक्यातील कुंडलिका सिंचनाखालील डोलवहाळ पाठबंधारेचे उजवा तीर डावा तीर कालवे झाले माळ रान पाणी नसल्याने झाडे झुडपं माती घनकचरा भरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत एवढेच नव्हे तर या कालव्यांच्या चक्क पाटबंधारे खात्याकडून गेली आठ ते दहा वर्षे केवळ काळवा केला असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग गेली अनेक वर्षे दुबार भात पिकांपासून वंचित राहिले आहेत ,
संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून समजला जाणारा तसेच शेतात राब राब राबून अन्न धान्य साठा निर्माण करून देणारा शेतकरी बळीराजा आज या ना कारणाने गांजला आहे अनेक संकटाना तोंड देत आहे त्यामुळे ईडा पीड़ा टळो बळीचे राज्य येवो। हि म्हण आता भात कोठार म्हणून इतिहासात जमा झालेल्या रायगडातुन हद्दपार झाल्याचे चिन्ह दिसत आहेत, शेतीला सोडाच मानवी स्वच्छता गुंरढोराना मागील आठ ते नऊ वर्षा पासून कोलाड़ पाठबंधारे अभूत पूर्व पुई पुगांव खांब वगळता नडवली चिल्हे देवकान्हे मालसाई धामणसई निडी तर्फे अष्ठमी तसेच आंबेवाड़ी किल्ला लांढर निवी भूवनेश्वर आशा गावांना पाणी नाही, अद्याप कालव्याची सफाई देखील नाही त्यात देखील मोठी दिरंगाई पाणी येईल की नाही यावर गेली अनेक वर्षे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे,त्यामुळे याबत पाणी वापर संस्था कोलाड ,रोहा, माणगांव, यांची सिंचनपूर्व हंगामा२०२०/२१ च्या आढावा बैठक पाणी वापर संस्थांबरोबर झाल्या की नाही याची कोणतीही माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याचे संकेत मिळत असून यावर उपाय योजना आहे की नाही हे देखील पाठबंधारे खात्याचे गुलदस्त्यातच पाणी वापर संस्थांच्या पदाधिकारी वर्गांना ठेवले की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे .
ऑक्टोबर महिना संपला की नोव्हेंबर महिन्यात जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि रोहा माणगाव नागोठणे कोलाड देवकान्हे धामणसई निवी धाटाव किल्ला आंबेवाडी या विभागातील पाणी वाटप संस्थांचे पदाधिकारी यांच्या समावेत बैठक घेण्यात येते परंतु कोरोना संकटामुळे ही बैठक घेण्यात आली की नाही याचे कोणतेही कारण समजू शकले नाही मात्र कालव्याचे काम पूर्ण करा त्यातील गाल कचरा काढण्यात यावा गेट मोऱ्या आदींची अर्धवट असलेली कामे पूर्ण करत आधारभूत शेतकऱ्यांना पाणी द्या अशी जोराची मागणी करणारी पाणी वापर संस्था आता या खात्याबाबत नाराजी व्यक्त करतांना दिसत आहे ,
मागील पन्नास ते साठ वर्ष सातत्याने कुंडलिकेच्या सिंचनातून उजवा तीर डावा तीर लगत असलेल्या शेतकऱ्यांना पुरेपूर पाणी मिळाले त्यातूनच ते दुबार भात पीक घेत सुखी आणि समाधानाने जगत होते मात्र २०११/१२ मध्ये सरकारी धोरण म्हणून हे कालवे शेतकऱ्यांकडून दुरुस्ती साठी घेण्यात आले असून कुंडलीकेच्या सिंचनातून उजवातीर म्हणून १ते ८पुई पुगांव खांब या मधे सुकेली आंबाखोरे सुकेली नागोठणे सह व्यावसायिक यांना पाणी वापर होतो ९ते २९ हा नडवळी देवकान्हे मालसई निडी तर्फे अष्ठमी आशा शेतकऱ्यांना या सिंचनातून पाणी वापर होतो डावा तीर यामधुन १ते १० कोलाड़ चिंचवली तिसे माणगाव १ते२०रोहा यामधे आंबेवाड़ी किल्ला वाशी निवी भुवनेश्वर असा समावेश आहे १ते ३३ तिसे धरणाची वाडी मोर्बा माणगाव शाखा माणगाव १ते५ गोरेगाव शाखा माणगाव शाखेत वडपाले टेमपाले यांचा देखील यामध्ये समाविष्ट आहे, रोहा माणगाव या शाखेच्या कालवा दुरुस्ती करता
२००८/२००९ या साली जागतिक बँकेनी पाणी वापर संस्था स्थापन करून काही कोटी रुपयांचे टेंडर या कमाकरता काढले हे टेंडर त्यांनी जलसंपदा विभाग वाइज शाखांच्या कामाकरता काढले मात्र आजतागत या कलव्यांचे काम पूर्ण तत्वावर नाही उलट असलेले कालवे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असे म्हटले तर वावग ठरणार नाही .








Be First to Comment