Press "Enter" to skip to content

नागोठणे कोलाड दरम्यान महामार्गावर पडले मोठ मोठे खड्डे

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त : अपघाताची शक्यता

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

मुंबई-गोवा महामार्गाचे कामकाज गेले कित्येक वर्ष रेंगाळले असून काम कासव गतीने पुढे जात आहे. त्यामुळे पादचारी, वाहन चालक कमालीचे वैतागले असतानाच नागोठणे कोलाड दरम्यान महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे या खड्ड्यांनी अपघातास निमंत्रणच दिले जात आहे.

अशाच प्रकारे नागोठणे कोलाड दरम्यान चिकणी गावाजवळ पडलेला मोठया खड्ड्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले या खड्ड्याचा अंदाज न आल्याने वाहने या खड्ड्यात आदळत असून लहान चार चाकी किंवा मोटार सायकल चालकांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महत्वपूर्ण बाबीकडे महामार्ग ठेकेदार व संबंधित अधिका-यांनी लक्ष देऊन हा खड्डा योग्य रित्या भरून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.

महामार्गावरच चिकणी गावाजवळ एका बाजूला पडलेला हा मोठा खड्डा भर दिवसादेखील वेगाने येणाऱ्या वाहनांना दिसत नसल्यामुळे अचानक या खड्ड्यात वेगवान वाहन आदळले जाते व वाहन उडते तसेच मोटारसायकल या खड्ड्यातून गेल्यास मोठा अपघात होऊन मोटारसायकल स्वारास आपला जीव देखील गमवावा लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. पहाटेच्या सुमारास धुक्याचे प्रमाण येवढे असते की वाहनचालकांना वाहने चालवतांना चार ते पाच फुट अंतरावरील काहीच दिसत नसते त्यातच महामार्गावर पडलेले मोठे खड्डे वाहन चालकांना दिसूच शकत नाही.

काही दिवसांपूर्वी ह्याच खड्ड्यात नविन लग्न झालेले जोडपे आपटून जखमी झाले होते. त्यांचे दैव्य बलत्तर म्हणून ते बाल बाल बचावले . अशा प्रकारच्या रात्री अपरात्री अनेक घटना घडत देखील असतील. महामार्गाचे कामकाज पूर्ण होईल तेव्हा होईल परंतु नागोठणे ते कोलाड पर्यंतचे खड्डे भरले तर मनुष्य हानी होणार नाही याची काळजी समंधितांनी घ्यावी अशी अपेक्षा वाहन चालाकांकडून केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.