सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ये थील हायस्कुल समोर असणाऱ्या काळभैरव मंदिर परिसरात महावितरण चा असलेला विद्युत खांब धोकादायक असून याकडे संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष असल्याबाबत नागरिक व ग्राहकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रेवदंडा येथील काळभैरव मंदीरापासून ते चौल बाह्य वळण रस्त्या दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर महावितरणचा हा विद्युत खांब एक बाजूला झुकला असून मुळापासून सिमेंट चा असलेला धक्का उखडला आहे. त्याला आधार देण्यासाठी एक ते दिड फूट अंतरावर दुसरा खांब उभा करण्यात आला आहे. मात्र या दुसऱ्या खांबावर झुकलेल्या विद्युत खांबाचा जोर त्याच्यावर आल्याने तोही खांब उखडण्याच्या स्थितीत असून तो वेळप्रसंगी जा-ये करणाऱ्या वाहनांवर पडून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने तातडीने लक्ष पुरवून वेळीच योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. अशी मागणी नागरिक व ग्राहकवर्गातून जोर धरीत आहे.








Be First to Comment