Press "Enter" to skip to content

डोंबे विद्यालय ते श्रीरामपूल रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे : भाजपची मागणी

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

दहिवली येथील स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रेय पांडुरंग डोंबे विद्यालय ते श्रीरामपूल या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. दहिवली येथील स्वातंत्र्य सेनानी डोंबे विद्यालय ते श्रीरामपूल या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम मार्च 2020 पासून गेले, आठ-नऊ महिने बंद आहे रस्ता खराब झाल्यामुळे लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे, तरी अपूर्ण राहिलेले काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे.

किसान मोर्चाचे सुनिल गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, शहर अध्यक्ष नगरसेवक बळवंत घुमरे,उद्योग आघाडी जिल्हा संयोजक मंदार मेहेंदळे, विजय कुळकर्णी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता चौधरी यांनी निवेदन सादर केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.