सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल भैय्या दुबाले यांनी भेट घेतली.
यावेळी त्यांनी दुर्लक्षित झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या अडचणी मांडल्या शिक्षण,स्वरक्षण,आरोग्य,रोजगार आणि निवारा या मूलभूत गोष्टींवर सविस्तर चर्चा केली.
माननीय राज्यपाल यांनी पोलीस परिवारा संबधी आपुलकी व्यक्त केली आणि कामाचे कौतुक केले व मी कायम त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायम प्रयत्न करेल. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना अशीच चांगली कामे करा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्या असे शब्द बोलून पाठ थोपटली.
यावेळी राज्य सचिव योगेश कदम, मुंबई अध्यक्ष सिद्धांत बागुल ,मुंबई संपर्क प्रमुख सिद्धेश्वर सुळे व अंकुश पवार उपस्थित होते.








Be First to Comment