कोरोना प्रादुर्भावामुळे चुकली केळवणे येथील शिर्डी साईंची दिंडी
दरवर्षी महाराष्ट्रातील असंख्य दिंड्या पायी चालत शिर्डीला बहुसंख्येने जात असतात , ह्या भक्तांना बाबाची कीर्ती असल्याचे असंख्य साक्षात्कार दिसून येतात,त्यातील एक चर्चित दिंडी म्हणजे केळवणे गावातील ॐ साई पदयात्रा मंडळाची निघणारी दिंडी ( उरण पनवेल पेण विभाग ) विशेष म्हणजे एक नंबर मानाची समजली जाणाऱ्या उरणच्या दिंडी नंतर हिच दिंडी मोठी आहे………
एव्हाना संध्याकाळ टळुन गेली होती , रात्र व्हायच्या आत चंदनापुरीघाट उतरून पायथ्याशी वस्ती करायची होती ,त्यात हा घाट म्हणजे निर्जन रस्ता आणि चोर लुटारुंची भीती ,दिंडीतील सर्व साईभक्त जीव मुठीत घेऊन साईनामाचा धावा करत घाट उतरु लागले आणि अचानक पाऊस आला ,थोडक्यात आपण भिजू वर सामान भिजून नुकसान होईल ते वेगळेच ही खंत सर्व भाविकांना झाली , पाच मिनिटे चालल्यावर सर्वांच्या लक्षात आले की पाऊस धो-धो पडतोय पण दिंडीतील एकही माणूस भिजत नाही कारण रस्त्याच्या एकाच बाजूला पाऊस पडतोय आणि एका बाजूला काहीच नाही ,हा चमत्कार फक्त बाबांनीच केलाय हे सर्वांनी जाणले, ही उरण-पनवेल पेण विभागातील केळवणे गावची पहिली दिंडी होती ,जणू बाबा त्यांच्या पाठीशीच आहेत असा हा संकेत होता .दिंडीचे अध्यक्ष जगन्नाथ हिराजी शिवकर यांच्या मार्गदर्शनात निघालेली पूर्व विभागातील पहिली दिंडी .
१६ वर्षापूर्वी साईभक्तीशी काडीचाही सबंध नसलेला हा तरुण आपले कुटुंब आणि व्यवसाय यातच गुंतला होता पण वशेणी गावातील जे.डी.पाटील या मित्राने त्याला नवघर गावातील दिंडीत बळेच सामील केले आणि तेथेच त्याला साईभक्तीचे वेड लागले .
|| साई भक्तीचा लळा लागे ज्याशी ||
|| मिटे भय चिंता पूर्ण आयुष्याची ||
|| भक्तांचा हा भार घेई शिरावर ||
|| मार्ग करी चोखळ जीवन मुक्तीचा ||
ह्या दिंडीतील ३ वर्षात त्याला हे जाणवते की साईबाबांनी जातीवाद ,अश्पृशता नष्ट करण्यासाठी अखंड प्रयत्न केले पण आज माणसांच्या मनगुटीवर उच-निच ही भावना तशीच बसलेली आहे ,हा भेद कमी करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू,तसेच आपल्या ग्रामीण भागातील सर्व भक्तांच्या पदरी दिंडीचे पुण्य मिळावे म्हणून आपल्या काही मित्रांना व सहकारी घेऊन गोवठणे येथे पहिली पुर्वविभागातील दिंडी चालू केली.
त्यात प्रथम केळवणे गावचा सहभाग जास्त झाल्यामुले दोन वर्षानंतर ही दिंडी केळवणे येथेच स्थलांतर झाली , सुरूवातीला दोनशे लोकांपासुन सुरू झालेली ही दिंडी ह्या वर्षी हजाराचा आकडा पार करणार यात शंकाच नाही, कारण या दिंडीत जो माणूस जातो त्या प्रत्येकाला एक नवा अनुभव आणि बाबांचा साक्षात्कार दिसतो.
असेच एकदा राजगुरुनगर सोडून काही अंतरावर दिंडी जात असताना पालखीचे वजन हळूहळू वाढू लागले अकरा किलो वजनाची पालखी चार जणांना पेलवेनाशी झाली कित्येकांनी अदलाबदली करुन पाहिजे पण वजन दहा पटीने वाढले होते,इतक्यात एक कार पालखी समोर थांबली ,त्यातून एक सुट-बुटवाला माणूस बाहेर आला आणि अंगात आल्यासारखा हावभाव करु लागला ,चालणं,उभं राहणं अगदी बाबांसारखी चिलीम ओढनही आणि त्यांच्या समोर गोवठणे येथील एक व्यक्ती आला आसता एखाद्या लहान मुलाला फेकावा तसा फेकून दिला आणि कुणाला काही कळण्याच्या आत पालखीला हात लाऊन जिलेबी-फाफडा प्रसाद पालखीत ठेऊन निघून गेला आणि काय आश्चर्य पालखीचे वजन कमी होऊन फुलांप्रमाणे हलकी झाली ,संगमनेरला पण एक वर्षी असाच प्रत्यय आला ,एक आजीबाई येऊन पालखीत एक रुपया टाकला आणि पालखी जागची हलेना,सर्व भाविक रडू लागले आणि कळकळीने विनवनी केली बाबा आमचे काही चुकले तर अपराध पोटात घाला ,तेव्हा कुठं पालखी हलकी झाली.
एक वर्षी चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी आनंदवाडी येथे स्वामी समर्थांच्या मंदिराच्या बाजुला दिंडीची वस्ती होती ,रात्री दिंडीतील सर्वजण महाप्रसाद घेत होते, एक लहान मुलगी बांघकाम होत असलेल्या इमारतीच्या मागे सहज गेली असता उघड्या पाण्याने भरलेल्या टाकीत पडली,थोड्या वेळाने तेथे एक बाई गेली आणि तिने हात धरून बाहेर काढली वर आल्यावर मुलीने सांगितले मी तीन वेळ खाली तळाशी गेली पण तीनही वेळ मला कोणीतरी वर ढकलत होता ,अर्थात हे बाबांशिवाय कोणाचचं काम नव्हते .
बाबा आपल्या भक्तांची कधीच साथ सोडत नाहीत ,या वर्षी दिंडीला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत ,नियमित जाणारे भाविक सांगतात ,आमच्या पाठीशी बाबा असल्याचे असंख्य अनुभव आले आहेत ,कितीही माणसे असली तरी जेवण कमी पडत नाही की कोणतीही अडचण आली तरी मार्ग निघल्या शिवाय रहात नाही कारण एक माणसाला आठ रात्री नऊ दिवस दोन वेळ जेवण दोन वेळ नास्ता , राहण्याची व्यवस्था वैद्यकीय सोय व इतर भरपूर सुविधा आणि वर प्रत्येक स्त्री ला साडी व पुरषाला टी शर्ट तसेच मुलींना सुट पीस हे फक्त साईबाबांच्या आशीर्वादान आणि त्यांच्याच रुपातील अनेक भाविक देणगीदारांमुळेच शक्य आहे. म्हणूनच गेल्या वर्षी बाबांच्या अकरा वचनांच्या आधारावर व दिंडीला अकरा वर्षे पूर्ण झाले ह्या निमित्ताने प्रत्येक माणसी फक्त अकरा रूपये दक्षीणा स्वरूपात घेऊन सर्व सुविधा निशुल्क ठेवल्या होत्या , त्यासाठी साई संस्थान वहाळचे संथापक रवीशेठ पाटील यांचा सिंहाचा वाटा होता.अशी माहिती या बारा वर्षात दहा वेळा अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे श्री .जगन्नाथ हिराजी शिवकर यांनी दिली .
एकदा तर देणगी खुपच कमी मिळाली होती आता कसे होणार ही चिंता होती त्यावेळी कामशेत जवळ पालखी समोर एक धिप्पाड उंच असे आजोबा येऊन म्हणाले “मला दिंडीला पाच हजार रूपये देणगी द्यायची आहे ” हातात पैसे घेऊन पावती देते वेळी आजोबा गायब! हे बाबाच होते , भक्तांच्या समस्या बाबा नेहमीच सोडवतात. या वर्षी ही दिंडी कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमानुसार रद्द केल्याने समस्त साईभक्तांना दुःख झाले आहे ,मात्र शुक्रवार १८ डिसेंबर ते शनिवार १९ डिसेंबर या काळात केळवणे येथून सकाळी ७ वाजता बाबांचे चरण घेऊन शिर्डीला जाण्याचा निर्णय पदयात्रा मंडळाने घेतला आहे .तसे पंचक्रोशीतील सर्व साई भक्तांना बाबांच्या चरणकमळाचे दर्शन घेऊन निरोप घेण्यासाठी केळवणे येथे सकाळी येण्यास कळविण्यात आले आहे.तसेच साईभक्तांच्या व पदयात्रींच्या आग्रहाने केळवणे येथेच रविवारी १० जानेवारीला साई मंगल कार्यालय वाघेश्वर टेकडी येथे साई भंडारा आयोजित केला आहे .
या वर्षी भले दिंडी होत नसली तरी , साईबाबांचे चरण दर्शन करणे व कार्यात सहकार्य करणे म्हणजे पुण्याचचं काम.
ॐ साई राम
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४
Be First to Comment