सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
गेली तीन ते चार दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था पाहता या पावसात या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असुन यामुळे या महामार्गावरून प्रवास करणे अधिक धोक्याचे झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील, कोलाड, खांब,सुकेळी, वाकण, नागोठणे दरम्यान या रस्त्याला अवकाळी पावसामुळे पडलेले चिखल व खड्डे यामुळे प्रवास करतांना प्रवासी वर्गाची तारांबळ उडत आहे.या महामार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था पाहता अनेक वेळा वाहनांचे टायर पंम्पचर होऊन दोन तीन तास प्रवाश्यांचा खोळंबा होत आहे.यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होतआहे.
खड्डयांमुळे मनक्याचे अजार, कंबरदुखी, पोटदूखी, या सारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहेे.या चौपदरीकरणात बनविण्यात आणलेले रस्ते धोकादायक ठरत असुन प्रवासी वर्गाच्या जिवाचा जणू खेळ मांडला आहे. तर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेली माती मिश्रित खडीचे धूळीत रूपांतर झाले याला पर्याय म्हणून या महामार्गावर पाण्याची फवारणी करून रस्ताचे काम न करता उगाच वेळ वाया घालवत जणू टाइम्सपास चालला आहे.
परंतु अशा अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरलेले असुन यामुळे अपघात होऊन प्रवाशाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण ? असा खड़ा सवाल प्रवाशी वर्गातुन केला जात असुन या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी किती वर्ष लागतील याची खात्री देता येत नाही.








Be First to Comment