सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।
मुरूड तालुक्यातील खोरा बंदर येथे जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी पर्यटकमोठा या समुद्र किनारी पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येत असतानाच ह्या ठिकाणीसुद्धा पर्यटकांनी मद्यपीचा अड्डा बनवत चालला आहे.
जंजिरा किल्ला आणि कासा किल्ल्यात जाण्यासाठी पर्यटक मोठया प्रमाणात मुरुड येथे येत असतात.जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी राजपुरी व एकदरा येथील खोरा बंदर येथून बोटी सुटतात. खोरा बंदर हे मुरूड शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे.आणि पर्यटकांना नजीक पडत असल्याने येथून ते जंजिरा किल्ला येथे जात असतात.
मात्र खोरा बंदर येथे सात ते आठ जणांचा एक पर्यटकांचा समूह खोरा बंदरात आला होता. त्यांना किल्ल्यात जाणाऱ्या बोटींवाल्यानी जंजिरा किल्ल्यात जायचे असेल तर तिकीट घेण्यास सांगितले.मात्र त्यांनी सांगितले की,आम्हाला कासा किल्ल्यात जायचे आहे.पर्यटकांपैकी काही जण बिअर पिणाऱ्यांना महाराष्ट्र सागरी मंडळाच्या (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड)च्या कर्मचारी यांनी त्यांना अडविले मात्र त्यांनासुद्धा उलटसुलट उत्तरे देण्यात आली.
सार्वजनिक ठिकांणी काही पर्यटक तसेच या परिसरातील मद्यपी हे या ठिकाणी येऊन राजरोसपणे मद्यपान करीत असतात.आणि मद्यपान (बिअर)झाल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या मद्याच्या बाटल्या हातात घेऊन बोटीतुन गेले.मात्र ते समुद्रात जाऊन मद्यप्राशन केल्यानन्तर त्या रिकाम्या बाटल्या समुद्रात फेकून देणार.मात्र मद्यपान करून कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण?असाही प्रश्न उपस्थित होत आहे.प
एक दिवसाच्या मौज मस्तीसाठी मुंबई पुणे येथील नागरिकांना मुरूड तालुका हा हाकेच्या अंतरावर असल्याने सकाळी गाडीने यायचे आणि दिवसभर मौजमस्ती करून रात्री उशिरापर्यंत घरी पोहचायचे हे त्यांचे ठरलेला कार्यक्रम असतो.त्या उद्देशाने ही मंडळी आपल्या मित्रासोबत येत असताना सोबत मद्यपान
करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य सोबत घेऊन येत असतात.
जंजिरा किल्ल्यावर अथवा कासा किल्ल्यावर कोणीहीमद्यपान करून जात असेल तर त्याला अटकाव घातला पाहिजे यासाठी संबंधित विभागाने दक्ष असणे गरजेचे आहे असे नाशिक येथून आलेले पर्यटक स्नेहा विखे पाटील यांनी सांगितले.








Be First to Comment