सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
मागील दोन दिवसापासून वेळी अवेळी पडणाऱ्या अवकाळी पावसाची ससेमिरा कायम सर्वांच्या पाठीशी लागल्याने सर्वांचीच कुचंबना होताना दिसत आहे. तर शेतकरी वर्ग अधिक धास्तावला आहे.
दोन दिवसापासून दिवसभर वातावरणात असलेले ढगाळ वातावरण व जाणवत असलेली कमालीची उष्णता अशा परिस्थितीत कोणत्याही वेळी पाऊस कोसळेल असा जाणकार मंडळींनी अंदाज बांधला होता व त्याची प्रचिती शनिवारी दि.१२ डिसेंबर २०२० रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आली.नंतर दुसऱ्या दिवशी रविवार दि.१३ रोजी दु.१ वा तशीच परिस्थिती वाहावयास मिळाली.अकाशात अचानक ढग जमा झाले व रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यात अवकाली पावसाने झोडपून काढले अशाप्रकारे अधून मधून हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाचे रड गाणे आता कायमचे पाठीशी लागल्याने सर्वांचीच कुचंबना तर होत आहेच याशिवाय याचा फटका मात्र शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे.
अगोदरच कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव व नंतर निसर्ग चक्री वादळाने सर्व नागरिक हैराण झाले होते नंतर पावसाळी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात चांगले पीक येऊन हि अति पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे अन्नधान्य,बी बियाणे ,याशिवाय गुरांच्या चारा यांचा देखील प्रश्न शेतकरी वर्गाला सतावणार आहे एवढे नुकसान सोसूनही शेतकरी वर्गाने कडधान्याची पेरणी केली परंतु वेळी अवेळी पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे कडधान्याच्या पिकालाही मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे निसर्गाच्या बदलामुळे थंडी गायब होऊ लागली त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून कायमचा अवकाळी पावसाचा ससेमिरी कायम पाठीशी लागल्याने शेतकरी वर्गाची बागायती शेती सह कडधान्य पिकाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत असून यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्राला याची चांगलीच झळ सोसावी लागत असल्यामुळे सर्वांच्या चिंत्तेत आता भर पडू लागली आहे








Be First to Comment