Press "Enter" to skip to content

भक्ती केली तर वैराग्य प्राप्त होते : ह.भ.प.मारुती महाराज कोल्हाटकर

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

स्वानंद सुख निवासी गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेम वर्धक वारकरी संप्रदायाच्या माध्य्मातुन ५२ वर्षे सुरू असणारी रोहा ते आळंदी पायी दिंडी सोहळा कोरोनामूळे रद्द करण्यात परंतु संत ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमीत्त दीड दिवसाचा अखंड हरिनाम सोहळा आयोजित करण्यात आला.या किर्तन सेवेत भक्ती केली तर वैराग्य प्राप्त होते असे मत आयोजित किर्तन सेवेत ह.भ.प. मारुती महाराज कोल्हाटकर यांनी व्यक्त केले.

भक्ती केली तर वैराग्य प्राप्त होते हे स्पष्ट करतांना गुरुवर्य ह.भ.प.मारुती महाराज कोल्हाटकर यांनी सांगितले की विठ्ठलपंत हे वैराग्याचे प्रतीक होते तर त्यांची पत्नी रुक्मिणी भक्तीची प्रतिक होती.यांच्या मिलनाने ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. त्यांनी सर्व विश्वाला भक्तिचा मार्ग दाखवला.यामुळे जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत.तोपर्यंत ज्ञानोबाचे नाव राहील नव्हे,नव्हे,जोपर्यंत ज्ञानेश्वरांचे नाव आहे.तोपर्यत चंद्र सूर्य राहतील त्यामुळे परमार्थ्याचे चिंतन केले पाहिजे .त्यांनी इन्द्रिय,हात,पाय,कान,देह दिला त्यामुळे त्याचे भजन जमेल त्या ठिकाणी केले पाहिजे.

यावेळी ह.भ.प.प्रकाश थिटे,रविंद्र मरवडे, कोस्तेकर, डॉ० बालाजी वाखरकर,डॉ० महेंद्र म्हात्रे,गंगाराम दळवी,सतीश कुलकर्णी, कवितके,तसेच कोलाड खांब असंख्य नागरिक उपस्थित होते. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वानंद सुख निवासी गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेम वर्धक वारकरी रोहा ते आळंदी दिंडीचे संस्थापक गुरुवर्य ह.भ.प.दळवी महाराज, ह.भ.प गुरुवर्य मारुती महाराज कोल्हाटकर,संस्था अध्यक्ष ह.भ.प.शेळके महाराज, ह.भ.प.अनिल महाराज सानप, ह.भ.प.रवी मरवडे, ह भ प सहादेव महाडिक,ह भ प्रदीप महाबळे, ह भ प मनोहर पाटील, ह-भ-प महादेव महाबळे,ह भ प बामुगडे महाराज, व प्रेम वर्धक वारकरी संप्रदायाचे सर्व सदस्य व महिला वर्ग यांनी मेहनत घेतली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.