Press "Enter" to skip to content

प्रेम वर्धक वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सोहळा संपन्न

चांगले कार्य करण्यासाठी ध्येय निश्चित करा फळ चांगले मिळेल : ह भ प दळवी महाराज गुरुजी

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम।

कोणतेही चांगले कार्य करण्यासाठी ध्येय निश्चित करा त्याचे फळ चांगले मिळाल्याशिवाय रहाणार नाही असे मत ह.भ.प.दळवी महाराज गुरुजी यांनी प्रेम वर्धक वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सोहळ्या निमीत्त कीर्तन सेवेत व्यक्त केले.

लेकुराचे हित।वाहे माऊलीचे चित्त !१।।
ऐशी कळवळ्याची जाती।करीं लाभेविण प्रीती । पोटी भार वाहे।त्याचे सर्वस्व हि साहे।।२।।तुका म्हणे माझे । तैसें तुम्हा संतां ओझे।।३।। या जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या आधारे स्पष्ट करतांना ह.भ.प.दळवी महाराज यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की महराष्ट्रात अन्यायाची आग ओकत असतांना जिजाऊंच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा जिजामातेने शिवाजी महाराज यांना रामयण व महाभारत यांच्या गोष्टी सांगीतल्या समाजात होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढायचे शिकवले.शिवाजी राजा हा रयतेचा राजा व्हावा हे ध्येय त्या माऊलीने निश्चित केले होते.कारण त्या माऊलीला मुलाचे हित कशात आहे ते माहिती होते.

स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य सुकन्या अलिबाग कर महाराज प्रेम वर्धक वारकरी संप्रदाय तालुका रोहा यांच्या माध्यमातून रोहा ते आळंदी येथे जाणारी पायी दिंडी चालू वर्षी कोरोनामुळे व आळंदी येथील संचारबंदीमूळे स्थगित करण्यात आली.परंतु या कार्यक्रमानिमित्त दीड दिवसाचा अखंड हरिनाम सोहळा खांब येथील पेट्रोल पंपासमोर कवितके फार्म हाऊस वर आयोजित करण्यात आला.

सकाळी ८ वाजता पादुकापूजन, ध्वजारोहन, करण्यात आले तसेच ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यात आले दुपारी १० ते २ या वेळात ह.भ.प मारुती महाराज कोल्हाटकर व प्रेम वर्धक वारकरी संप्रदाय यांच्यावतीने मोफत नेत्रदान शिबीर घेण्यात आला सायंकाळी ५ ते ६ वाजता ह भ प गुरुवर्य शेळके महाराज व ह भ प अनिल महाराज सानप यांचा प्रवचन आयोजित करण्यात आला तसेच सात ते आठ ह भ प रवी महाराज मरवडे व प्रेम वर्धक वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.